ETV Bharat / state

साताऱ्यात राष्ट्रवादी सोडणारा कधी खासदार होत नाही - जयंत पाटील

author img

By

Published : Sep 23, 2019, 12:26 PM IST

राष्ट्रवादीची सभा साताऱ्यात रविवारी पार पडली. या सभेत प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी उदयनराजे भोसले याच्यांवर टीका केली.

राष्ट्रवादी काँगेस प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील

सातारा - रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा साताऱ्यात पार पडली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. या सभेत बोलताना प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांनी राष्ट्रवादी सोडली त्यांना खासदार होता येत नाही, असा टोला त्यांना लगावला आहे.

भाषणात सांगितले की मी आधीच सांगत होतो त्यावेळेस माझा ऐकलं नाही, त्यावेळी मी लहान होतो. जे पवार साहेबांच्या विचारांनी चालत नसतील त्यांना पक्षात घेऊ नका. मात्र, तरी देखील घेतले गेले. मी अजून सांगतो बॅट हातात घेतली म्हणून कोणी धोनी होत नाही, तर ज्यांनी राष्ट्रवादी सोडली त्यांना खासदार होता येत नाही असा टोला देखील उदयनराजे भोसले यांना लगावला.

निवडणुका जाहीर झाल्या नाहीत म्हणून कोणाच्या तरी पोटात गोळा उठला आहे. धक्का बसलाय, आता पाया पडायचे सुरू आहे. आता मुजरा करून लोकसभा आणि विधानसभा एकत्र घ्या अशी विनंती करण्यात येत आहे. मात्र, हातात बॅट घेणारा कोणी धोनी होत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी उदयनराजेंना लगवला.

यावर बोलताना मी जयंतचा सल्ला मी ऐकला नाही, अशी कबुली दिली पवार म्हणाले, ‘जयंत पाटील यांचा सल्ला न ऐकण्याचं कारण एवढच होतं की, तुम्हाला आम्हाला या गादीचा अभिमान आहे. ती गादी शिवबाची आहे. त्यांनी ते करावं पण, मी चुकलो. मला आता त्यावर फारसं बोलायचं नाही. कारण, वेगळा मार्ग स्वीकारायचा हा त्यांना लोकशाहीने अधिकार दिला आहे.

Intro:सातारा
जयंत पाटील यांनी भाषणात सांगितले की मी आधीच सांगत होतो त्यावेळेस माझा आईकल गेलं नाही त्यावेळी मी लहान होतो. जे पवार साहेबांच्या विचारांनी चालत नसतील त्यांना पक्षत घेऊ नका मात्र तरी देखील घेतले गेले. मी अजून सांगतो बॉट हातात घेतली म्हणून कोणी धोनी होत नाही तर ज्यांनी राष्ट्रवादी सोडली त्यांना खासदार होता येत नाही असा टोला देखील उदयनराजे भोसले यांना लावला.Body:यावरती पवार म्हणाले मी जयंत चा सल्ला मी ऐकला नाही, अशी कबुली दिली ते म्हणाले, ‘जयंत पाटील यांचा सल्ला न ऐकण्याचं कारण एवढच होतं की, तुम्हाला आम्हाला या गादीचा अभिमान आहे. ती गादी शिवबाची आहे. त्यांनी ते करावं पण, मी चुकलो. मला आता त्यावर फारसं बोलायचं नाही. कारण, वेगळा मार्ग  स्वीकारायचा हा त्यांना लोकशाहीने अधिकार दिला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.