ETV Bharat / state

टोल विरोधात सातारकर रस्त्यावर; जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसांचा अल्टिमेटम

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. या रस्त्याच्या सहापदरी रुंदीकरणासह इतर सुविधांची सर्व कामे होईपर्यंत टोल न देण्याची जाहीर भूमिका सातारकरांनी घेतली आहे.

15 दिवसांत महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
author img

By

Published : Nov 20, 2019, 11:33 AM IST

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग व सर्व्हीस रोडची 15 दिवसात दुरुस्ती न झाल्यास आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत असमाधान व्यक्त करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे 'टोल विरोधी सातारी जनता' च्या सदस्यांनी सांगितले.

15 दिवसांत महामार्गाची दुरुस्ती न झाल्यास आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सातारा ते पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट आहे. या रस्त्याच्या सहापदरी रुंदीकरणासह इतर सुविधांची सर्व कामे होईपर्यंत टोल न देण्याची जाहीर भूमिका सातारकरांनी घेतली आहे.

टोलविरोधी लढ्यासाठी 'टोल विरोधी सातारी जनता' नामक सामाजिक समूहाने जबाबदारी घेतली आहे. महामार्गाच्या दुरवस्थेबाबत सातारकरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तीव्र असंतोष आहे. समाजमाध्यमातून या विषयावर पडसाद उमटत असल्याने एकप्रकारे जनरेटा तयार झाला आहे. त्यातच लोकप्रतिनिधींनीही हे आंदोलन उचलून धरल्याने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच रिलायन्स आणि अन्य संबंधित जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

रस्त्याच्या सहापदरी रुंदीकरणासह इतर सुविधांची सर्व कामे होईपर्यंत टोल न देण्याची सातारकरांची जाहीर भूमिका

शिवेंद्रसिंहराजे यांनी महामार्ग, सर्व्हीस रोडवरील खड्डे भरणार आहात की नाही? असा सवाल करून अधिकार्‍यांना धारेवर धरले. तसेच काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. पंधरा दिवसांत काम न झाल्यास सोळाव्या दिवशी आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला. तसेच जोपर्यंत काम होत नाही; तोपर्यंत टोल वसुली बंद करा, असे शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सुनावले.

बैठकीला उपस्थित अधिकार्‍यांनी येत्या 15 दिवसांत महामार्ग आणि सर्व्हीस रोडवरील खड्डे कार्पेट करून भरण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, महामार्गावरील इतर सोयी सुविधांसाठी वेळ लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या बैठकीस आमदार भोसले यांच्यासह 'टोल विरोधी सातारी जनता' समुहातील सर्व सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चिटणीस, रिलायन्स कंपनीचे गांधी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

20 किलोमिटरमध्ये पास देण्याची मागणी

पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आनेवाडी टोलनाक्यापासून 20 किलोमीटर परिघात येणार्‍या गावांमधील वाहनचालकांना सवलत पास देणे बंधनकारक असल्याची माहिती त्यांनी दिली. या सर्व गावातील वाहनचालकांनी सवलत पास घेतले नसतील तर ते घ्यावेत, असे भोसले म्हणाले. संबंधित अधिकार्‍यांनी या लोकांना ते द्यावेत. स्वत: सवलत मिळणार्‍या गावांची यादी प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्ध करणार असल्याचे आमदार भोसले यांनी सांगितले.

आंदोलनकर्ते न्यायालयात जाणार

टोलविरोधी सातारी जनता आंदोलनाचे प्रतिनिधी रवींद्र नलवडे यांनी बैठकीतील चर्चेबाबत असमाधान व्यक्त केले. शासनाच्या निकषांनुसार जनतेला महामार्गावर सुविधा मिळायला हव्या, असे ते म्हणाले. तसेच तात्पुरती मलमपट्टी आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. जनतेच्या न्यायहक्कासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे नलवडे यांनी माध्यमांना सांगितले.

Intro:सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग व सेवा रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती १५ दिवसांत न झाल्यास आनेवाडी ( ता. सातारा) येथे टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज जिल्हाधिका-यांच्या बैठकीत दिला. अधिका-यांनी दिलेल्या आश्वासनाबाबत असमाधान व्यक्त करत 'टोल विरोधी सातारी जनता'च्या सदस्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इरादा व्यक्त केला.Body:पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सातारा-पुणे अंतरातील रस्त्याची अवस्था बिकट आहे. या रस्त्याच्या सहापदरी रुंदीकरणासह सुविधांची सर्व कामे होईपर्यंत टोल न देण्याची जाहीर भूमिका
सातारकर नागरिकांनी घेतली आहे. टोलविरोधी लढ्यासाठी 'टोल विरोधी सातारी जनता' हा सामाजिक समूहाने घेतली आहे. महामार्गाच्या दुरावस्थेबाबत सातारकरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तिव्र असंतोष खदखदत आहे. समाजमाध्यमातून या अनुषंगाने तिव्र पडसाद उमटत असल्याने एकप्रकारे जनरेटा तयार झाला आहे. लोकप्रतिनिधींनीही हे आंदोलन उचलून धरल्याने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी त्य‍ंच्या दालनात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, रिलायन्सचे अधिकारी आणि जिल्हा प्रशासनातील अधिका-यांची बैठक घेतली.

शिवेंद्रसिंहराजे यांनी महामार्ग, सेवा रस्त्यांवरील खड्डे भरणार आहात का नाही? असा खडा सवाल करुन अधिकार्‍यांची बोलती बंद केली. तसेच जोपर्यंत काम होत नाही, सोयी सुविधा देत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा, अशी मागणीही त्यांनी केली. उपस्थित अधिकार्‍यांनी येत्या १५ दिवसांत महामार्ग आणि सेवा रस्त्यांवरील खड्डे कार्पेट करुन भरले जातील असे सांगितले. मात्र सोयी सुविधांसाठी थोडा वेळ लागेल, असे सांगितले. तुम्ही १५ दिवसांची वेळ घेतली आहे. वेळेत महामार्ग आणि सेवा रस्त्यांची दुरुस्ती करा. खड्डे कार्पेट करुन भरा, पेव्हर ब्लॉक चालणार नाहीत. १५ दिवसांत काम झाले नाही तर, १६ व्या दिवशी आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला. तसेच तुम्हाला जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी सुनावले.

बैठकीस आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह टोल विरोधी सातारी जनता समुहातील सर्व सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चिटणिस, रिलायन्स कंपनीचे गांधी यांच्यासह सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.  

२० किलोमिटरमध्ये पास द्या

पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. "आनेवाडी टोलनाक्यापासून २० किलोमीटर परिघात येणार्‍या गावांतील वाहनचालकांना सवलत पास देणे बंधनकारक आहे. या सर्व गावातील वाहनचालकांनी सवलत पास घेतले नसतील तर ते घ्यावेत. संबंधीत अधिकार्‍यांनी या लोकांना ते द्यावेत. मी स्वत: सवलत मिळणार्‍या गावांची यादी घेवून ती प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिध्द करणार."

आंदोलनकर्ते न्यायालयात जाणार

टोलविरोधी सातारी जनता आंदोलनाचे प्रतिनिधी रवींद्र नलवडे यांनी बैठकीतील चर्चेबाबत असमाधान व्यक्त केले. शासनाच्या निकषांनुसार जनतेला महामार्गावर सुविधा मिळायला हव्यात. तात्पुरती मलमपट्टी आम्हाला मान्य नाही. जनतेच्या न्यायहक्कासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे श्री. नलवडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

---------Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.