सातारा : माथाडी कामगारांचे आराध्य दैवत दिवंगत अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली (Narendra Patil reappointed as Chairman) आहे. याबाबतचा शासन निर्णय सोमवारी काढण्यात आला (Annasaheb Patil Economic Development Corporation) आहे.
पंधरा दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांची घोषणा : महाविकास आघाडीच्या काळात देखील नरेंद्र पाटील हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष होते. परंतु, देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समर्थक असल्याच्या कारणावरून त्यांच्याकडून अध्यक्षपद काढून घेण्यात आले होते. नरेंद्र पाटील यांनी अध्यक्षपद देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंधरा दिवसांपूर्वी नवी मुंबईतील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली होती. त्यानुसार त्यांच्या नियुक्तीचा आदेश आज काढण्यात आला (Economic Development Corporation in Satara) आहे.
मविआ सरकारने काढूले होते अध्यक्षपद : नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केल्यानंतर २०१९ ला सातारा लोकसभा निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने शिवसेनेत प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली होती. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने अध्यक्षपद काढून घेतल्यानंतर आता सत्तेवर आलेल्या भाजप-शिंदे गटाने नरेंद्र पाटील यांना महामंडळाचे अध्यक्षपद देऊन घोषणेची पुर्तता केली (Annasaheb Patil Economic Development Corporation) आहे.