ETV Bharat / state

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरीचे यश कोल्हापूरला अर्पण; पृथ्वीराज पाटीलची प्रतिक्रिया - महाराष्ट्र केसरी बातमी

महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari ) स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरचा 5-4 असा पराभव केला. त्यानंतर आपले यश मी कोल्हापूरला अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराजने व्यक्त केली आहे.

Prithviraj Patil
Prithviraj Patil
author img

By

Published : Apr 10, 2022, 6:02 PM IST

सातारा - साताऱ्यात छत्रपती शाहू क्रीडा संकूलात 64 वी महाराष्ट्र केसरी ( Maharahstra Kesari ) स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरचा 5-4 असा पराभव ( Maharashtra Kesari Winner Prithviraj Patil ) केला. त्यानंतर पृथ्वीराज पाटीलने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मिळालेले यश मी माझ्या कोल्हापूर जिल्ह्याला अर्पण करतो. आता ऑलिंपिक वर्ल्ड चॅम्पियनशिप हे माझे ध्येय आहे, असा दृढनिश्चय पृथ्वीराज पाटीलने 'ईटिव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.

जिंकायचचं ठरवून उतरलो - पुढे बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाला की, "महाराष्ट्र केसरीची गदा काहीही करुन जिंकायचीच असा निश्चिय करुन मी उतरलो होतो. पूर्वीपासून मला ही कुस्ती जिंकणार, असा विश्वास होता. सुरुवातीला प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेऊन शेवटी आक्रमण करायचे धोरण ठरवले होते. साताऱ्यात मी जे ठरवले होते त्याप्रमाणे कुस्ती होत गेली. अंतिम क्षणी माझी चाल यशस्वी झाली. मी माझे हे यश कोल्हापूर जिल्ह्याला अर्पण करतो," असेही पृथ्वीराज पाटील याने म्हटले आहे.

पृथ्वीराज पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना

कोण आहे पृथ्वीराज पाटील? - पृथ्वीराज पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा आहे. त्याने संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा केला. वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराज पाटील ९५ किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. तो सध्या आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : जाणून घ्या अटकेपार कामगिरी करणाऱ्या कराडकर मल्लांबद्दल!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.