ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ, मुस्लीम बांधवांनी ५०० कुटुंबांना दिला आधार - लॉकडाऊनमध्ये मुस्लीम बांधवांची मदत

मुस्लीम समाजातील नागरिकांनी आज आपल्या समाज्याच्या माध्यमातून मदत गोळा करत जवळपास पाचशे कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतका किराणा घरी जाऊन वाटप केला आहे. यामध्ये पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, 1 किलो तेल, पावशेर चटणी, एक एक किलोच्या दोन डाळी, चहा पावडर, तीन किलो साखर या वस्तूंचे वाटप केले आहे.

satara latest news  muslim community people  muslim help needy  लॉकडाऊनमध्ये मुस्लीम बांधवांची मदत  सातारा लेटेस्ट न्युज
लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ, मुस्लीम बांधवांनी ५०० कुटुंबांना दिला आधार
author img

By

Published : May 6, 2020, 12:51 PM IST

Updated : May 6, 2020, 3:00 PM IST

सातारा - कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात देशात लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या अनेक कुटुंबीयांना दोन वेळचं अन्न मिळवणं अवघड झालं आहे. मात्र, अश्या कुटुंबांना भोजन मिळावं यासाठी अनेक हात लॉकडाउनमध्येही पुढे सरसावले आहेत. या मदतीसाठी मुस्लीम बांधवांनी पुढाकार घेतला आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ, मुस्लीम बांधवांनी ५०० कुटुंबांना दिला आधार

मुस्लीम समाजातील नागरिकांनी आज आपल्या समाज्याच्या माध्यमातून मदत गोळा करत जवळपास पाचशे कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतका किराणा घरी जाऊन वाटप केला आहे. यामध्ये पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, 1 किलो तेल, पावशेर चटणी, एक एक किलोच्या दोन डाळी, चहा पावडर, तीन किलो साखर या वस्तूंचे वाटप केले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीला देखील इथून पुढे उभे राहणार असल्याचे यावेळी मुस्लीम बांधववांनी सांगितले आहे.

इस्लाम धर्मात रमजानमध्ये आपल्या उत्पन्नातील अडीच टक्के रक्कम दान केल्यास सत्तर पटीने पुण्य मिळते. त्याच पद्धतीने आम्ही आमच्या समाजामधून ही मदत लॉकडाऊनमध्ये गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात वाटप करत आहोत. मागील महिन्यात अडीशे कुटुंबातील नागरिकांना मदत केली होती, यावेळी पाचशे कुटुंबांना मदत केली, असे मुस्लाीम बांधवांनी सांगितले.

Last Updated : May 6, 2020, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.