सातारा - राज्यातील माण आणि खटाव हे तालुके कायम दुष्काळी म्हणून ओळखले जातात. मात्र, गेले दोन वर्षांपासून या तालुक्यात असणाऱ्या खटाव गावात हिंदु-मुस्लिम एकोपा पहिला मिळतो आहे. कारण मोहरमचे पंजे आणि गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढत हिंदू-मुस्लिम बांधवांनी ऐक्याच दर्शन घडवले.
अजिंक्य तरुण मंडळ आणि मुस्लिम समाजाचे ताबूत हे सलग दुसऱ्या वर्षी एकाच छताखाली विराजमान झाले होते. अजिंक्य मंडळ बाप्पाला प्रत्येक वर्षी नवव्या दिवशी निरोप देतो आणि याच दिवशी पंजाचे विसर्जनही आले. त्यामुळे बाप्पा आणि पंजे या दोघांची मिरवणूक एकत्रित काढत खटावकरांनी सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे.