ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ, भाजप नेत्याबरोबर खासदार उदयनराजेंची एक तास बंद दाराआड चर्चा - bjp

पंढरपूर विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष, भाजपचे नेते अतुल भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या सोमवारी संध्याकाळी झालेल्या चर्चेने राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे.

भाजप नेत्याबरोबर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची एक तास कमरबंद चर्चा
author img

By

Published : Aug 27, 2019, 2:51 AM IST

Updated : Aug 27, 2019, 3:01 AM IST

सातारा - सध्या जिल्ह्यातील राजकारणात मोठे बदल होत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व भाजप नेते अतुल भोसले यांच्या 1 तास रंगलेल्या चर्चेने राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे.

पंढरपूर विठ्ठल रूक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष, भाजप नेते अतुल भोसले हे सोमवारी सायंकाळच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात आले. उदयनराजे यांचे समर्थक सुनील काटकर हे अतुल भोसले यांना खासदार भोसले यांच्या कक्षात घेऊन गेले. तेथे उदयनराजे आणि अतुल भोसले यांच्यात जवळपास 1 तास बंददाराआड चर्चा झाली. या भेटीने जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळींत तर्कवितर्कांना उधान आले आहे.

उदयनराजेंना चर्चेचा सूर विचारला असता ते म्हणाले कि आमची जुणी मैत्री आहे, आम्ही भेटू शकत नाही का? मागच्या वेळी मी सुद्धा त्यांचा प्रचार केला होता. यावरती अतुल भोसलेंनी देखील आमची मैत्री दाट असल्याची पुष्टी दिली. त्यावर ती मैत्र फक्त पातळ होऊ देऊ नका, अशी टिप्पणीही खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

Intro:सातारा : जिल्ह्यातील राजकारणात मोठे बदल होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पंढरपूरच्या विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष भाजपचे नेते अतुल भोसले हे आज (सोमवार) सायंकाळच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात आले. खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक सुनील काटकर यांनी भोसले यांना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कक्षात घेऊन गेले. तेथे खासदार भोसले व अतुल भोसले यांची एक तास कमराबंद चर्चा झाली. उदयनराजे आणि अतुल भाेसले यांच्या भेटीने जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळी गरद झाली आहेत.Body:यावेळी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले आमची मैत्री आहे. आम्ही भेटू शकत नाही का. मागच्या वेळी मी पण त्यांचा प्रचारा केला होता. यावरती अतुल भोसले म्हणाले आमची मैत्री घाट आहे. त्यावरती खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले ती मैत्र फक्त पातळ होऊ देऊ नका.

Conclusion:
Last Updated : Aug 27, 2019, 3:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.