ETV Bharat / state

...तर मराठा आरक्षणप्रश्नी राजीनामा देणार; उदयनराजे कडाडले - mp Udayanraje Bhosale latest news

साताऱ्यात आज त्यांनी 'जलमंदिर पॅलेस ' या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर भूमिका मांडली.

mp Udayanraje Bhosale
खासदार उदयनराजे भोसले
author img

By

Published : Sep 18, 2020, 7:09 PM IST

Updated : Sep 18, 2020, 7:21 PM IST

सातारा - मराठा समाजातील बहुतांश लोकांना खायला अन्न नाही. मुलांची लग्न ठरत नाहीत. किती दिवस नुसती चर्चा, चर्चा अन् चर्चाच करायची. या समाजाबाबत न्याय होत नसेल तर, पदावर राहून तरी काय उपयोग? माझी कोणत्या पक्षाशी बांधिलकी नाही तर, लोकांना मी बांधिल आहे. त्यासाठी राजीनामा द्यायची वेळ आली तर, आता तो देईन, असा उद्वेग खासदार उदयनराजे भोसले यांनी आज व्यक्त केला.

खासदार उदयनराजे भोसले

साताऱ्यात आज त्यांनी 'जलमंदिर पॅलेस ' या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावर भूमिका मांडली. ते म्हणाले, राज्य शासन असो की केंद्र सरकार. आरक्षणाच्या विषयावर चर्चा करणार का? असे माध्यमे विचारतात. कोणाशी आणि कसली चर्चा करायची? कशाचा विचारविनीमय करायचा? त्यांचे त्यांना कळत नाही का? आता लोकच त्यांच्याकडे बघतील. प्रत्येक ठिकाणी राजकारण. आता राजकारण हे गजकर्ण झाल आहे. कोणावर अन्याय होत असेल तर, अॅक्शनवर रिअॅक्शन येणारच. मग मी लोकांना थोपवू शकत नाही, असे सांगतानाच, केवळ मी मराठा आहे म्हणून मी या समाजाची बाजू घेतोय, असे नाही. कोणावर अन्याय होऊ द्यायचा नाही, हा माझा स्वभाव आहे. फक्त मराठा समाज म्हणून नव्हे तर, कोणत्याही समाजावर अन्याय होत असेल तर त्या समाजाचे नेतृत्व मी करेन, असे खासदार उदयनराजे म्हणाले.

हेही वाचा - 'आंबेडकर स्मारकाचा पायाभरणी समारंभ येत्या काही दिवसात'

कोर्ट म्हणजे तरी काय? मला कोर्टाचा अवमान करायचा नाही. पण कोर्ट म्हणजे एक इमारतच ना! तिथे बसणारीही माणसेच ना! डोक्याने नाही, हृदयातून विचार करायला पाहिजे. प्रत्येकाला न्याय देता आला पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.

पक्षीय भूमिकेबाबत उदयनराजे म्हणाले, मला कोणत्याही पक्षाचे लेबल लावू नका. माझी बांधिलकी लोकांशी आहे, पक्षाशी नाही. कोणताही पक्ष हा लोकांच्या जीवावर मोठा होतो. त्यामुळे सर्वांनीच लोकभावनेचा आदर करायला पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी कोणीही श्रेयवाद आणू नये. कालच्या तरुणांचे केस आज पांढरे झाले, आणखी किती चर्चा करणार आहात? वर्षांनुवर्षे पिचलेल्या या समाजाला न्याय न मिळाल्यास उद्या उद्रेक होऊ शकतो. याची जबाबदारी कोण घेणार, असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिला.

हेही वाचा - बनवा बनवी : 9 लाखांच्या बिलावर रुग्णालयाकडून 1 रुपया डिस्काऊंट

Last Updated : Sep 18, 2020, 7:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.