ETV Bharat / state

'या' निर्णयामुळे १० लाख लोक‍ांवर अन्याय, काका-पुतण्याचे खरे चेहरे जनतेसमोर' - निरा-देवघरचे पाणीप्रश्न

निरा-देवघरचे पाणीप्रश्नावरुन माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रीमंडळावर टीका केली आहे. दुष्काळी भागाचे पाणी बारामतीकडे वळवण्याचे महापाप मंत्रीमंडळाचे असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

MP Ranjaitsingh naik nimablkar comment on sharad pawar
रणजितसिंह नाईक निंबाळकरांची पवारांवर टीका
author img

By

Published : Feb 20, 2020, 9:38 PM IST

सातारा - निरा-देवघरचे पाणी बारामतीकडे वळवण्य‍ाचे महापाप मंत्रीमंडळाने केले आहे. ‍हा निर्णय बारामतीकरांचा आहे. या निर्णयामुळे दुष्काळी भागातील १० लाख लोक‍ांवर अन्याय झाला असल्याचे वक्तव्य माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. लवकरच या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटलेले दिसतील असेही निंबाळकर म्हणाले.

निरा-देवघरचे पाणी उजव्या कालव्याने सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यात शेतीसाठी जाते. डाव्या कालव्याचे पाणी पुणे जिल्ह्यातील ‍बारामती, इंदापूर तालुक्यांना जाते. निरा-देवघरचे पाणी पुणे जिल्ह्याकडे ५५ टक्के तर सातारा व सोलापूर जिल्ह्याकडे ४५ टक्के या प्रमाणात वाटपाचा निर्णय काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला होता. दुष्काळी तालुक्यांच्या वाट्याचे पाणी बारामतीकडे वळवण्याला माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांचा विरोध आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकरांची पवारांवर टीका

पवार काका – पुतण्याचे खरे चेहरा जनतेसमोर

दुष्काळी भागातील हक्काच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची आपली तयारी आहे. दुष्काळी पट्ट्यातील लोकांचा नीरा देवघरच्या पाण्यावर सर्वाधिक हक्क आहे. दरम्यान, या निर्णयाने दुखावलेल्या खासदार निंबाळकर यांनी शरद पवार व अजित पवार यांच्यावर जळजळीत टीका करीत पवार यांचे दुष्काळी भागाबाबत असणारे प्रेम हे दिखावा असून, ते केवळ पाणी, टँकर व जनावरांच्या छावण्यांना भेटी देण्यात धन्यता मानतात. मात्र, दुष्काळी भागाला कायमस्वरूपी पाणीदार करण्याबाबत त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप खासदार निंबाळकर यांनी केला आहे. तर पवार काका – पुतण्याचे खरे चेहरा जनतेसमोर आले आहेत.

मंत्रीमंडळ‍ाचा हा निर्णय विश्वासघातकी व दुर्दैवी असल्याचे निंबाळकर म्हणाले. या निर्णयामुळे सुमारे १० लाख लोकांवर अन्याय झाला आहे. त्याचे पडसाद सर्वसामान्य जनतेमधून उमटतील. या विरोधात जनआंदोलन उभे केले जाईल. लवकरच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवणार आहोत. तसेच योग्य त्या न्यायालयात दाद मागणार आहोत. मंत्रीमंडळाने जरी हा निर्णय घेतला असला तरी तो न्यायालयात टिकणार नसल्याचे निंबाळकर म्हणाले.

ही लढाई रस्त्यावर आणि न्यायालयात

नीरा देवघर आणि गुंजवणी धरणाचे 55 टक्के पाणी पुन्हा डाव्या कालव्यात सोडण्याचा महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात फलटण, माळशिरस, सांगोला आणि पंढरपूर भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. आता ही लढाई रस्त्यावर आणि न्यायालयात लढण्याची घोषणा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

पवारांनी निरा-देवधर चे पाणी बारामतीला पळवल्याचे सिद्ध करत तत्कालीन भाजपा सरकारला ते पाणी बंद करण्यास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून भाग पाडले होते. त्यावेळी त्या प्रश्नावरून मोठे राजकारण तापले होते. काल (बुधुवार) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नीरा डाव्या कालव्याचं पाणी पुन्हा एकदा बारामतीसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील हक्काच्या पाण्यावर पुन्हा एकदा ‘दादा’गिरी होत असल्याने यावरून राजकारण तापले आहे. बेकायदेशीर पाणी वापरास आपला विरोध असल्याचे निंबाळकर यावेळी म्हणाले.

शरद पवार हे याच दुष्काळी भागातून निवडणूक लढले होते. विजयीही झाले मात्र, खंडाळा ते सांगोला आणि पंढरपूर ते फलटण या भागातील हक्काचे पाणी बेकायदेशीर बारामतीला नेण्यासाठी मी यापूर्वीही विरोध केला आहे. आणि आता तर मंत्रिमंडळाने तसा या भागातील जनतेच्या मनाविरोधात निर्णय घेतला आहे. आम्ही त्या विरोधात न्यायालयात जाणार असून, बेकायदेशीर कामाला विरोध हा करीत राहणार असल्याचे निंबाळकर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.