सातारा - जिल्ह्यात मागील 24 तासांत 1 हजार 990 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.
साताऱ्याचा आकडा घटेना
सातारा तालुक्यात सर्वाधिक 336 रुग्ण आढळले. तर जावळीत 75, कराड 231, खंडाळा 84, खटाव 262, कोरेगाव 250, माण 209, महाबळेश्वर 39, पाटण 158, वाई 62 व इतर 13 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले. आजपर्यंत एकूण बाधितांची संख्या 1 लाख 64 हजार 463 वर पोहोचली आहे. जिल्ह्याचे आजचे बाधितांचे प्रमाण 12.31 टक्के इतके आहे.
22 हजार 9 रुग्ण सक्रिय
आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये जावळी 2, कराड 4, खंडाळा 3, खटाव 4, कोरेगाव 1, माण 1, महाबळेश्वर 1, फलटण 4, सातारा 3, वाई 3 यांचा समावेश आहे. आजपर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण 3 हजार 642 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 22 हजार 9 रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
1 हजार 360 नागरिकांना कोरोनामुक्त
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज (दि. 30 मे) संध्याकाळपर्यंत 1 हजार 360 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
हेही वाचा - पत्रकारांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडी निर्णय घेईल, अजित पवारांची ग्वाही