सातारा - राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून खबदारी घ्यावी. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहन गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक गृह राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार - गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई - कोरोना अपडेट गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई
रस्त्यांवर विना मास्क कोणी दिसल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना करून गृहराज्यमंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, कोरोनाचा संसर्गाचा रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील कमीत कमी 20 जणांची कोरोना चाचणी करावी. तसेच जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे.
सातारा