ETV Bharat / state

Shambhuraj Desai Challenges Aaditya Thackeray : हिंमत असेल तर, पाटणमधून निवडणूक लढवून दाखवा; शंभूराज देसाईंचे आदित्य ठाकरेंना आव्हान - आदित्य ठाकरे

हिंमत असेल तर पाटणमधून निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान शंभूराज देसाईंनी आमदार आदित्य ठाकरेंना दिले आहे. आदित्य ठाकरेंनी काल (शुक्रवारी) मुख्यमंत्र्यांना वरळी मतदारसंघातून निवडून येऊन दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी पाटण विधानसभा मतदार संघात येऊन निवडून येऊन दाखवा, असे प्रति आव्हान शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.

Shambhuraj Desai Challenges Aaditya Thackeray
शंभूराज देसाईंचे आदित्य ठाकरेंना आव्हान
author img

By

Published : Feb 4, 2023, 7:10 PM IST

सातारा - आदित्य ठाकरे वरळीतून निवडून येण्यासाठी शिवसेनेला दोन दिग्गज नेत्यांना विधान परिषदेवर घ्यावे लागले. तेच त्या आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणे हस्यास्पद आहे. मुख्यमंत्र्यांचे राहू द्या, तुम्ही पाटण विधानसभा मतदार संघात येऊन निवडून येऊन दाखवा, असे आव्हान उत्पादन शुल्क मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. आदित्य ठाकरेंनी काल (शुक्रवारी) मुख्यमंत्र्यांना वरळी मतदारसंघातून निवडून येऊन दाखविण्याचे आव्हान दिले होते. त्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना शंभूराजेंनी प्रतिआव्हान दिले.

निवडून येण्यासाठी दोघांना आमदारकी : आदित्य ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांना वरळीतून निवडून येण्याचे आव्हान देणार्‍या आदित्य ठाकरेंना निवडून येण्यासाठी शिवसेनेला सुनील शिंदे, सचिन अहिर या दिग्गजांना विधान परिषदेवर घ्यावे लागले होते. स्वत: निवडणून येण्यासाठी दोन आमदारक्या द्याव्या लागल्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान देणे हास्यास्पद असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.

आव्हान देण्याची भाषा करू नये : पुन्हा निवडणुक लावायची तयारी असेल तर आदित्य ठाकरेंनी पाटण विधानसभा मतदार संघात येऊन विधानसभेची निवडणूक लढवावी दाखवावे. ज्यांच्या मागे 50 आमदार आणि 13 खासदार आहेत, त्यांना आव्हान देण्याची भाषा करु नये, असा सूचक इशारा शंभूराज देसाईंनी आदित्य ठाकरेंना दिला.

अजित पवार मुख्यमंत्री झाले असते, पण... महाविकास आघाडी स्थापन झाली त्यावेळी आमदारांची संख्या जास्त असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता. परंतु, तसे होऊ शकले नाही. आमदारांच्या संख्याबळावर त्यावेळी अजितदादा मुख्यमंत्री झाले असते तर कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढलेला पहायला मिळाला असता, अशी गुगली देखील शंभूराज देसाईंनी टाकली.

मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे होते : मुख्यमंत्रीपद जाण्यासाठी राष्ट्रवादीचे वरीष्ठ नेतेच जबाबदार असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. तो धागा पकडून शंभूराज देसाई म्हणाले, अजित पवारांचे म्हणणे योग्य आहे. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे महाविकास आघाडीत देखील ठरले असावे. त्यांच्या सुत्राप्रमाणे विचार केला तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पद मिळायला पाहिजे होते. ते का मिळू शकले नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

शंभूराज देसाईंना प्रत्युत्तर : शंभूराज देसाईंनी आदित्य ठाकरेंना पाटण विधानसभा मतदारसंघात येऊन लढण्याचे आव्हान देण्यापेक्षा अगोदर त्यांनी आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकाबरोबर लढून निवडून येऊन दाखवावे. मगच आदित्य ठाकरे यांना आव्हान द्यावे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी शंभूराज देसाईंना दिले आहे.

देसाई काहीही बोलतात : हर्षद कदम म्हणाले, पालकमंत्री शंभूराज देसाई हे माईक समोर आला की काहीही बोलतात. संधी मिळेल तेव्हा ठाकरे कुटुंबावर टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना संधी देण्यासाठी सुनील शिंदे यांनी आपला हक्काचा मतदारसंघ सोडून आपली पक्षनिष्ठ दाखवून दिली होती. परंतु देसाई आणि पक्षनिष्ठा यांचा कधी संबंध आलेला दिसलेला नाही.

आदित्य ठाकरेंच्या सभेमुळेच विजयी झालात : शंभूराज देसाई आज आदित्य ठाकरेंवर टीका करत आहेत. परंतु, तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत शंभुराजेंनी आदित्य ठाकरे यांची प्रचार सभा घेतली होती. त्यांच्या प्रचारामुळेच आपण यशापर्यंत पोहोचू शकला. त्याचा त्यांना सोयीस्कर विसर पडलेला दिसतोय. तीनवेळा ते शिवसेनेच्या बळावर निवडून आले आहेत. ठाकरे परिवारावर टीका करण्याची त्यांची योग्यता नाही.

जनता निवडणुकीची वाट पाहतेय : पाटण तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार तीन वेळा शंभूराज देसाईंना निवडून आणले. तेच शंभूराज देसाई पक्षाच्या नेत्यांवर बोलत आहेत. त्यांचा आणि निष्ठेचा कधीही संबंध आलेला नाही. गेली पंचवीस वर्षे सातारा जिल्हा आणि पाटण विधानसभा मतदार संघाने शंभुराजेंची निष्ठा अनुभवलेली आहे. प्रत्येकवेळी त्यांची पक्षाविरोधी भूमिका पाहायला मिळाली आहे. त्यामुळे पाटणची जनता आता निवडणुकीची वाटच पाहतेय, असा इशारा हर्षद कदम यांनी दिला.

हेही वाचा - Satyajeet Tambe : मी अपक्षच राहून कार्य करणार; सत्यजित तांबेंचे स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.