ETV Bharat / state

गृहराज्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घडवली लोकनेत्यांच्या स्मारकाची सफर

author img

By

Published : Jun 15, 2021, 7:13 PM IST

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या बैठकीसाठी पाटणला आलेल्या जिल्हाधिकारी, सीईओ आणि पोलीस अधीक्षकांना स्वत: गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या वाहानातून लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाची सफर घडवली. यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी स्वत: गाडीचे सारथ्य केल्याचे पाहायला मिळाले.

गृहराज्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घडवली लोकनेत्यांच्या स्मारकाची सफर
गृहराज्यमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घडवली लोकनेत्यांच्या स्मारकाची सफर

कराड (सातारा) - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या बैठकीसाठी पाटणला आलेल्या जिल्हाधिकारी, सीईओ आणि पोलीस अधीक्षकांना स्वत: गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या वाहानातून लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाची सफर घडवली. यावेळी गृहराज्यमंत्र्यांनी स्वत: गाडीचे सारथ्य केल्याचे पाहायला मिळाले.

निमित्त होते पाटण विधानसभा मतदारसंघातील आपत्ती व्यवस्थापन व प्राथमिक नियोजनासंदर्भात प्रशासनाच्या आढावा बैठकीचे. या बैठकीसाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल उपस्थित होते. आपत्ती नियोजनाची बैठक संपल्यानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या समवेत तिन्ही अधिकार्‍यांनी दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकाची पाहणी केली. स्मारकातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या छायाचित्रांचे दालन याबरोबच स्मारकाच्या दुसर्‍या टप्प्यातील कामांची देखील त्यांनी पाहणी केली. तसेच गृहराज्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानी तिन्ही अधिकार्‍यांचा सत्कार देखील केला.

अधिकाऱ्यांना सुखद धक्का

जिल्हाधिकार्‍यांसह तीन वरिष्ठ अधिकार्‍यांना आपल्या गाडीत बसवून गृहराज्यमंत्र्यांनी स्वत: गाडीचे सारथ्य तर केलेच. परंतु, अधिकार्‍यांचा यथोचित पाहुणचार करत त्यांना सुखद धक्का देखील दिला. प्रशासकीय अधिकार्‍यांशी समन्वय ठेऊन काम करणारे लोकप्रतिनिधी म्हणून शंभूराज देसाई यांचा प्रशासनात लौकीक आहे. त्याचेच दर्शन यानिमित्ताने सर्वांना घडले.

हेही वाचा -'केंद्राने राज्याला लसीचे झुकते माप द्यावे' - आरोग्यमंत्री राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.