ETV Bharat / state

सैन्य दलात नोकरी लावण्याच्या आमिषाने लाखोंचा गंडा

भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी पालवण येथील गणराज करिअर अकॅडमीचे चालक भगवान अनिल शिरतोडे व त्याचा साथीदार शुभम राजेंद्र शिंदे, विष्णू ठोंबरे यांच्यासह बनावट वैद्यकीय तपासणी केल्याप्रकरणी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमधील हवालदार हणमंत गुलाबराव देवकुळे यांचा या प्रकरणात समावेश आहे.

सातारा
author img

By

Published : Mar 10, 2019, 11:33 AM IST

सातारा - भारतीय सैन्य दलात नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माण तालुक्यातील गणराज करिअर अॅकॅडमीचे चालक भगवान अनिल शिरतोडे (रा. आझादपूर, ता. कोरेगाव) व त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी पालवण येथील गणराज करिअर अकॅडमीचे चालक भगवान अनिल शिरतोडे व त्याचा साथीदार शुभम राजेंद्र शिंदे, विष्णू ठोंबरे यांच्यासह बनावट वैद्यकीय तपासणी केल्याप्रकरणी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमधील हवालदार हणमंत गुलाबराव देवकुळे यांचा या प्रकरणात समावेश आहे. शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शिरतोडे व शिंदे यांच्या मुसक्या आवळल्या. याबाबत अंगापूर (ता. सातारा) येथील युवकाने तक्रार दिली होती. संशयित आरोपीची माण तालुक्यात पालवन येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अॅकॅडमी आहे. या दोघांनी सैन्यदलात भरती होण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांचा शोध घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्याकडून भरतीच्या नावाखाली १ लाख रुपये घेतल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे.

संशयीतांनी फसवणूक झालेल्या युवकांची पुणे येथील कमांड हॉस्पिटला वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोल्हापूर येथे प्रशिक्षणाला जाण्यासाठी बनावटी ऑर्डर दिल्या. या दरम्यान त्यांनी ५ लाख रुपये दिले होते. नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील प्रशिक्षण केंद्रात गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे कळाले. त्यानंतर संबंधित मुलांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. कागदपत्राची व इतर गोष्टींची पाहणी केली असता त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शिरतोडे व शिंदे यांना अटक केली आहे.

Intro:भारतीय सैन्य दलात नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी माण तालुक्यातील ॲकॅडमी चालक भगवान अनिल शिरतोडे रा.आझादपूर ता.कोरेगाव व त्याच्या साथीदारांना अटक केली आहे.

Body:याबद्दल अधिक माहिती अशी की, भरतीपूर्व प्रशिक्षण देणारी पालवण येथील गणराज करियर अकॅडमी चालक भगवान आनिल शिरतोडे व त्याचे साथीदार शुभम राजेंद्र शिंदे, विष्णू ठोंबरे यांच्यासह बनवट मेडिकल तपासणी केल्याप्रकरणी पुणे येथील कमांडो हॉस्पिटल मधील हवलदार हणमंत गुलाबराव देवकुळे याचा यात समावेशआहे. शिरतोडे व शिंदे यांच्या मुसक्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी आवळ्या. याबाबत अंगापुर ता.सातारा येथील युवकाने तक्रार दिली होती. संशयित आरोपी याची माण तालुक्यात पालवन येथे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी आहे. या दोन भामट्यांनी सैन्यदलात भरती होण्यासाठी धडपडत असलेल्या तरुणांचा शोध घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढले व त्यांच्याकडून भरतीच्या नावाखाली लाख रुपये घेतल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. संशयितांनी फसवणूक झालेले युवकांची पुणे येथील कमांडो हॉस्पिटला वैद्यकीय तपासणी करून त्यांना कोल्हापूर येथे प्रशिक्षणाला जाण्यासाठी खोट्या ऑर्डर दिल्या, या काळात पाच लाख रुपये दिले होते. जोईनिंग लेटर मिळाल्यानंतर कोल्हापूर प्रशिक्षण केंद्रात गेल्यानंतर ऑर्डर आर्मीच्या बनावट सही शिक्याने बनवलेल्या त्यांना कळले त्यानंतर संबंधित मुलांनी आर्मीचे अधिकाऱ्यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांची भेट घेऊन घडलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला कागदपत्राची व इतर गोष्टींची पाहणी केली असता. त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सूचना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने शिरतोडे व शिंदे यांना अटक केली आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.