ETV Bharat / state

कोयना नदीत मासेमाऱ्यांच्या गळाला लागले जिवंत लष्करी हँड ग्रेनेड, एटीएस पथक दाखल - सातारा कोयना नदी न्यूज

तांबवे येथे कोयना नदीच्या पात्रात मासेमारी करणाऱ्यांच्या गळाला लष्करी हॅंड ग्रेनेडची पिशवी लागील. त्यामुळे सातारा दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) घटनास्थळी दाखल झाले. ते जिवंत लष्करी हँड ग्रेनेड असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

satara
सातारा
author img

By

Published : May 17, 2021, 8:54 PM IST

कराड - तांबवे येथे कोयना नदीच्या पात्रात मासेमारी करणार्‍यांच्या गळाला प्लास्टीकची पिशवी लागली. त्या पिशवीत 3 जिवंत लष्करी हँड ग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) कराड तालुक्यातील तांबवे येथील घटनास्थळी दाखल झाले आहे. वरिष्ठ अधिकारी, बॉम्ब नाशक तसेच श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.

तांबवे येथील पुलानजीक नदीपात्रात आज (17 मे) सकाळी साकुर्डी गावातील तरूण मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यांनी पाण्यात गळ टाकला. गळाला ओढ लागल्याने मासा अडकला असावा म्हणून तरूणांनी गळ बाहेर काढला. तेव्हा या गळाला प्लास्टिकची पिशवी अडकली. पिशवी जड होती. तसेच त्यामध्ये बॉम्बसदृष्य वस्तू आढळल्याने तरूणांनी पोलिसांना खबर दिली.

कोयना नदीत मासेमाऱ्यांच्या गळाला जिवंत लष्करी हँड ग्रेनेड

संचारबंदीमुळे विजापूर-गुहागर महामार्गावरील साकुर्डी फाट्यावर कराड ग्रामीण पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावरील पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी वरिष्ठांनाही कळविले. त्यानंतर कराडचे डीवायएसपी रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना माहिती दिली.

बन्सल यांनी तातडीने दहशतवाद विरोधी पथक, श्वान पथक आणि बॉम्ब नाशक पथकाला घटनास्थळी पाठवून दिले. तिन्ही पथकांनी हँड ग्रेनेडची पाहणी केली. ते लष्करातील असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच जिवंत हँड ग्रेनेड असल्याने पोलिसांनी घटनास्थळपासून एक किलोमीटर अंतराचा परिसर पूर्ण रिकामा केला. दरम्यान, कोयना नदीच्या पुलापासून अवघ्या पन्नास फुटावर हँड ग्रेनेड सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - नाशिक : कोरोनामुळे 10 दिवसात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.