सातारा : भारताचे सुपर मॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण ( Milind Soman ) यांनी निरोगी आरोग्यासह पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी लाइफलाँग फ्रीराईड (Lifelong freeride) मुंबई मंगळूर ग्रीन राईड सायकलसह सुरू ( Mumbai Mangalore Green Ride Campaign ) केली आहे. सोमण हे लाइफलाँग फ्रीराईड सायकलवरून मुंबई, पुणे, कराड, कोल्हापूर, बेळगाव, शेगाव, हिरेबेन्नूर, तुमकुरू, म्हैसूर, मंगळूर या शहरातून ग्रीन राईड करणार आहेत.
फिटनेसचा संदेश: ग्राहकांसाठी टिकाऊ वस्तू बनविणार्या लाइफलाँग ऑनलाईन रिटेल प्रायव्हेट लिमिटेड ( LIFELONG ONLINE RETAIL PRIVATE LIMITED ) या आघाडीच्या कंपनीने ग्रीन राइड उपक्रम सुरू केला आहे. मिलिंद सोमण हे धावणे, सायकल चालवणे, अशा विविध उपक्रमांद्वारे फिटनेसचा संदेश देत असतात. ग्रीन राईड हा लोकांना निरोगी आरोग्य आणि प्रदूषणमुक्तीसाठी प्रोत्साहित करण्याचा उपक्रम आहे. डिस्क ब्रेक्स, ब्रेकिंग सिस्टमसाठी उत्कृष्ट ब्रेकिंग पॉवर, अशी वैशिष्ट्ये असलेल्या शिमॅनो 21 स्पीड गियर सायकलवरून ते प्रवास करत आहेत.
वाढते वायू प्रदूषण चिंताजनक : तंदुरुस्त आणि निरोगी जीवनशैली जगण्यासाठी व्यायाम करणार्या प्रत्येकासाठी वाढते वायू प्रदूषण हे चिंताजनक बनले आहे. पर्यावरण निरोगी आणि प्रदूषणमुक्त ठेवणे आपले नैतिक कर्तव्य आहे. त्यामुळे ग्रीन राईड उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. प्रदूषण कमी करण्यासाठी सायकलसारख्या वाहतुकीच्या पद्धतींचा वापर करणे आवश्यक असल्याचे मिलिंद सोमण म्हणाले. लाईफलाँग ऑनलाईन रिटेलचे भरत कालिया यांनी ग्रीन राईड उपक्रमामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी प्रोत्साहन देईल. दैनंदिन निवडीबद्दल जागरूक राहण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. मिलिंदचा सोमण यांचा हा प्रयत्न सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.