ETV Bharat / state

स्वातंत्र्याच्या 73 वर्षांमध्ये आम्हाला काय मिळाले; म्हाळुंगे ग्रामस्थांचा सवाल

फक्त शेपूट अन् शिंग नाही म्हणून आम्ही माणूस आहोत, नाहीतर जंगली जनावरांपेक्षा बत्तर आमची अवस्था आहे,या व्यथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कांदाटी खो-यात पिढीजात वास्तव्य करणारे ग्रामस्थ सांगत होते. स्वातंत्र्याच्या काळात आम्हाला काय मिळाले, असा सवाल कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांनी विचारला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हाळुंगे (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामस्थांशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला.

author img

By

Published : Aug 15, 2020, 3:06 AM IST

mhalunge
म्हाळुंगे ग्रामस्थ

सातारा- उशाला सह्याद्री आणि पायथ्याला शिवसागर जलाशय, भोवतीने जंगल ... बाथरुमला जरी घराच्या बाजूला जायचे झाले तरी अस्वल दबा धरुन बसले असेल की गवा सांगता येत नाही. फक्त शेपूट अन् शिंग नाही म्हणून आम्ही माणूस आहोत, नाहीतर जंगली जनावरांपेक्षा बत्तर आमची अवस्था आहे,या व्यथा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कांदाटी खो-यात पिढीजात वास्तव्य करणारे ग्रामस्थ सांगत होते. भारतीय स्वातंत्र्याचा 73 वा वर्धापनदिन शनिवारी साजरा होत आहे. मात्र, या काळात आम्हाला काय मिळाले, असा सवाल कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांनी विचारला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हाळुंगे (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामस्थांशी 'ईटीव्ही भारत'ने संवाद साधला.

स्वातंत्र्याच्या 73 वर्षांमध्ये आम्हाला काय मिळाले म्हाळुंगे ग्रामस्थांचा सवाल

बामणोलीच्या दक्षिणेला, दुर्गम कांदाटी खो-यात साधारण 200 लोकसंख्येचे म्हाळुंगे हे गाव आहे. घरटी माणूस रोजगारासाठी पुण्या-मुंबईला गेलेला पाहायला मिळते. गावी ज्येष्ठ मंडळी वास्तव्याला आहेत, अपवादात्मक एखादा तरुण गावात भेटतो. जलाशयापलीकडे शिंदी येथून कच्च्या रस्त्याने तापोळ्याला जाता येते. परंतू,पावसाळ्याच्या ४ महिन्यांत शिंदीपर्यंत नाव वल्हवून शिवसागर पार करणे मुश्किल असते ही या गावाची परिस्थिती आहे.

देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथम कोयना प्रकल्पाने आम्हाला विस्थापित केले. 1972 ला आम्ही भूकंपग्रस्त झालो, 1985 ला अभयारण्यग्रस्त आणि आता २०‍१० मध्ये व्याघ्र प्रकल्पाने ग्रस्त झालो आहोत. स्वातंत्र्योत्तर काळात आमच्यावर बंधने लादली गेली. कोणत्याच सुविधा आम्हाला मिळाल्या नाहीत. अंदमान-निकोबार बेटावर राहिल्यासारखी आमची अवस्था आहे. शासनाने आमचे उर्वरित आयुष्य सुखकर करावे, अशी कळकळीची विनंती ग्राम समितीचे अध्यक्ष सुरेश नारायण भोसले यांनी केली.

म्हाळुंगेचे माजी पोलीस पाटील बाबा भगवान भोसले म्हणाले, "सध्याच्या स्थितीत आम्हीं इथे जगू शकत नाही. मुलाबाळांना रोजगारासाठी मुंबईला जावे लागते. अल्पशिक्षणामुळे कपबशा विसळण्याची कामे करुन कसाबसा चरितार्थ चालवतात. त्यातच पोटाला चिमटा मारुन दोन पैसे गावाकडे राहिलेल्या म्हातारा-म्हातारीला पाठवतात. गावातील मुलांना स्थानिक स्तरावर रोजगार दिला गेला पाहिजे." आजारी माणसाला जगवण्यासाठी शासनाने म्हाळुंगे ते शिंदी किंवा तापोळ्याला जाण्यास लाँचची व्यवस्था करावी. शासन आम्हा ग्रामस्थांना दळणवळणाची बारमाही सुविधा देऊ शकत नसेल तर आमचे ऐच्छिक पुनर्रवसन करावे. आमच्या जमिनी ताब्यात घेऊन खातेदारांना मोबदला द्यावा, अशी मागणीही बाबा भोसले यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.