सातारा -कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये (Krishna Medical College Karad ) एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या ( MBBS student ) विद्यार्थ्याने मलकापूर- आगाशिवनगरमधील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ( MBBS student commits suicide ) केली आहे. अरिहंत राजेश जैन असे, विद्यार्थांचे नाव आहे. तो मूळचा शलेंद्र नगर, रायपूर, छत्तीसगड येथील रहीवाशी आहे.
राहत्या घरात घेतला गळफास - अरिहंत जैन हा कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. 9 जानेवारी पासून तो मलकापूरमधील आगाशिवनगर भागात आर्य भूषण अपार्टमेंटमधील अंकुश देशमुख यांच्या फलॅटमध्ये भाड्याने राहत होता. अरिहंत राहत असलेल्या फ्लॅटचा दरवाजा दोन दिवसांपासून बंद असल्याची माहिती त्यांना अपार्टमेंटमधील सुनील कुभार यांनी फ्लॅट मालक अंकुश देशमुख यांना दिली. देशमुख यांनी अपार्टमेंटमध्ये येऊन फ्लॅटचा दरवाजा तोडला. आत गेल्यावर बेडरूममधील पंख्याच्या हुकला अरिहंतने दोरीने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यांनी कराड शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली.
घटनेमागील कारण अस्पष्ट - विद्यार्थ्याने गळफास घेतला असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटमध्ये पोलिसांनी शोध घेतला. मात्र, पोलिसांना सुसाईड नोट मिळाले नाही. त्यामुळे अरिहंतच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळविण्यात आली आहे. कुटुंबियांकडे चौकशी केल्यानंतर या घटनेमागील कारण समजू शकेल, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा- Mumbai Public School : दर्जेदार अन् डिजिटल शिक्षणामुळे पालिका शाळांना 'अच्छे दिन'