ETV Bharat / state

लेखिका सुनीता भोसले यांना 'मातोश्री भीमाबाई आंबेडकर' पुरस्कार - writer Sunita Bhosale

साताऱ्यातील संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार 'विंचवाचं तेल' या बहुचर्चित आत्मकथनाच्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भोसले यांना जाहीर झाला आहे. दि. ४ डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

gajanan maharaj
गजानन महाराज
author img

By

Published : Nov 2, 2022, 3:42 PM IST

सातारा : सातारा येथील संबोधीत प्रतिष्ठानच्यावतीने दिला जाणारा मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार ( Matoshree Bhimabai Ambedkar Award ) 'विंचवाचं तेल' या बहुचर्चित आत्मकथनाच्या लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भोसले यांना जाहीर झाला आहे. ४ डिसेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर झिंब्रे, उपाध्यक्ष रमेश इंजे यांनी दिली आहे.

भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ पुरस्कार : साहित्य, कला, संस्कृती, महिला विकास व परिवर्तनाची चळवळीत योगदान ( Contribution in movement ) देणाऱ्या महिलांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ संबोधी प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. पारधी समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुनीता भोसले ( शिरुर, पुणे ) यांची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

२४ वर्षांपासून पुरस्काराचे वितरण : गेल्या २४ वर्षांपासून संबोधी प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार दिला जात आहे. ५ हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांच्या हस्ते दि. ४ डिसेंबर रोजी सातारा नगर वाचनालयाच्या पाठक हाॅलमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सुनीता भोसले या गेल्या २० वर्षांपासून फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा आदिवासी भटक्या समाजात रुजवण्याचे काम करीत आहेत. भटक्या समाजातील अनिष्ट चालीरिती,प्रथा मोडीत काढण्यासाठी प्रबोधन, अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढत आहेत. पुणे जिल्ह्यातील जातपंचायततीचे प्रकार थांबवण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान दिले आहे.

आतापर्यंत या मान्यवर महिलांना पुरस्कार : भीमाबाई आंबेडकर पुरस्काराने आतापर्यंत डॉ. ज्योती लांजेवार (नागपूर), प्रा.पुष्पा भावे (मुंबई), रझिया पटेल (पुणे), बेबीताई कांबळे (फलटण), यमुनाबाई वाईकर (वाई), प्रा. डाॅ. प्रज्ञा दया पवार (मुंबई), उर्मिला पवार (मुंबई), डॉ.सिसिलिया कार्व्हालो (वसई), प्रा.इंदिरा आठवले (नाशिक), पद्मश्री तिस्ता सेटलवाड (मुंबई), हिरा बनसोडे (मुंबई), प्रतिमा जोशी (मुंबई), उल्का महाजन (पनवेल), प्रा. सुशीला जाधव (औरंगाबाद), डॉ. गेल ऑम्वेट (कासेगाव), मेधाताई पाटकर (मुंबई), संध्या नरे-पवार (मुंबई), मुक्ता दाभोलकर (दापोली), मुक्ता मनोहर (पुणे), प्रा.आशालता कांबळे (डोंबिवली), निशा शिवरकर (संगमनेर), शिल्पा कांबळे (मुंबई), चेतना सिन्हा (म्हसवड-माण) या मान्यवर महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.