ETV Bharat / state

पूरग्रस्तांसाठी धावले दुष्काळी भागातील 'माणदेशी फाउंडेशन'; जनावरांना घेतले दत्तक

महापूर ओसरल्यावर बाधीत लोकांसाठी विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू आहे. तसेच गावातील मुक्या जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर प्रश्न बनलो होता. तेव्हा म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने तात्काळ कुरुंदवाड येथे सर्व्हे करण्यात आला व त्या गावातील जनावरांसाठी त्वरीत पेंढ व रहिवाशांसाठी ५ किलो गव्हाचे पीठ देण्यात आले.

author img

By

Published : Aug 21, 2019, 8:17 AM IST

सातारा

सातारा - सांगली, कोल्हापूरला महापुराचा तडाखा बसला होता. यात अनेकांचे संसार उद्धवस्थ झाले आहेत. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात समोर येत आहेत. मात्र, मुक्या जनावरांकडे दुर्लक्ष होत आहे. यासाठी म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने पुढाकार घेत कुरुंदवाड शहरातील अनेक जनावरे परिस्थिती व्यवस्थित होत नाही तोपर्यंत दत्तक घेतली आहेत. यावेळी जनावरांसाठी पेंड, ओला चारा, कुट्टी देण्याचे जाहीर करत त्याठिकाणी जात पशुखाद्याचे वाटपही सुरू केले आहे, माणेदेशी फाउंडेशनच्या या मदतीचे शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे.

पूरग्रस्तांसाठी धावले दुष्काळी भागातील 'माणदेशी फाऊंडेशन'

कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या माण तालुक्यात यंदाही दुष्काळाची छाया आहे. दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी माण तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे आजही १०० हुन अधिक टँकर सुरू आहेत, तर येथील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी जवळपास ८८ चारा छावण्या सुरू आहेत. म्हसवड शहरातील माणदेशी फाउंडेशनच्यावतीने जानेवारी महिन्यांपासूनच सुमारे ७ हजार जनावरांची चारा छावणी चालवली जात आहे. तालुक्यात अशी भीषण परिस्थिती असताना पुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचे अतोनात नुकसान झाले आहे. या जिल्ह्यातील काही गावांना महापुराने वेढा दिल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.

महापूर ओसरल्यावर महापुरातील लोकांसाठी विविध ठिकाणांहून मदतीचा ओघ सुरू आहे. तसेच गावातील मुक्या जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर प्रश्न बनलो होता. तेव्हा म्हसवड येथील माणदेशी फाउंडेशनने तात्काळ कुरुंदवाड येथे सर्व्हे करण्यात आला व त्या गावातील जनावरांसाठी त्वरीत पेंढ व रहिवाशांसाठी ५ किलो गव्हाचे पीठ देण्यात आले.

यावेळी बोलताना माणदेशी फाउंडेशनच्या प्रमुख चेतना सिन्हा म्हणाल्या की, माण तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्यांचा मोठा गंभीर प्रश्न आहे. त्यासाठी शासनस्तरावरून पाण्याचे टँकर व जनावरांच्या चारा छावण्या सुरू आहेत. दुष्काळाचे हे संकट माण तालुक्यातील जनतेला नवे नसले तरी अद्यापही या तालुक्यात पाऊसच पडला नाही. तालुक्यातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर ओढवणाऱ्या दुष्काळाच्या अस्मानी संकटाचा अंदाज बांधून केवळ त्यांचे पशुधन जगावे यासाठी आम्ही माणदेशी फाउंडेशनच्यावतीने जानेवारी महिन्यातच जनावरांची चारा छावणी सुरू केली. ती अद्यापही सुरू आहे. या चारा छावणीत सध्या सुमारे ७ हजार जनावरे तर २ हजार शेतकरी निवासी राहत आहेत. मात्र, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर हा अत्यंत भयानक आहे. या महापुराने अनेकांचे संसार वाहुन गेले आहेत. अनेक शेतकऱ्यांची मुकी जनावरेही महापुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. आता महापूर ओसरला असला तरी त्या महापुराने दिलेल्या जखमा ओल्या आहेत.

या महापुरातील जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाबरोबरच अनेक संस्था मदतीचा हात घेवून पुढे येत आहेत. ही वस्तुस्थिती असली तरी खरा प्रश्न आहे तो येथील मुक्या जनावरांचा. या महापुरात कुरुंदवाडकरांनी मोठे साहस दाखवत आपली जनावरे बिल्डिंगवर ठेवून त्यांचा जीव वाचवला आहे. या सर्व जनावरांना आम्ही दत्तक घेत असल्याचे चेतना सिन्हा यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱयांना एकप्रकारे हा दिलासाच आहे.

Intro:सातारा
सांगली कोल्हापुर या जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घालत तेथील अनेक छोट्या मोठ्या शहरांना आपल्या कवेत घेतल्याने गत १० दिवसांपासुन महापुराच्या पाण्यात अडकलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी मदतीचे अनेक ओघ सुरु झाले असले तरी खरा प्रश्न होता तो महापुरात अडकलेल्या शेतकर्यांकडील मुक्या जनावरांचा त्यासाठी म्हसवड येथील माणदेशी फाऊंडेशनने एक पाऊल पुढे टाकत कुरुंदवाड शहरातील सर्व मुकी जनावरे जोवर परिस्थिती सुरळीत होत नाही तोवर दत्तक घेत त्या जनावरांसाठी पेंड, ओला चारा, कुट्टी देण्याचे जाहीर करीत त्याठिकाणी जावुन वरील पशुखाद्याचे वाटपही सुरु केले, माणदेशीच्या या दातृत्वाबद्दल अनेक शेतकरीवर्गातुन त्याचे आभार व्यक्त होत आहे.Body:कायम दुष्काळाशी सामना करणार्या माण तालुक्यात यंदा तर दुष्काळाची परिसिमा झालेली असुन या दुष्काळी जनतेला दिलासा देण्यासाठी माण तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे आजही १०० हुन अधिक टँकर सुरु आहेत, तर येथील शेतकर्यांच्या जनावरांसाठी जवळपास ८८ चारा छावण्या सुरु आहेत, म्हसवड शहरातील माणदेशी फाऊंडेशनच्या वतीने जानेवारी महिन्यांपासुनच सुमारे ७ हजार जनावरांची चारा छावणी चालवली जात आहे, अशी तालुक्यातील परिस्थिती असताना नुकत्याच झालेल्या पावसाने शेजारील कोल्हापुर व सांगली जिल्ह्याचे अतोनात नुकसान केले आहे या जिल्ह्यातील काही गावांना महापुराने वेढा दिल्याने नागरीकांचे हाल सुरु आहेत, महापुर ओसरल्यावर महापुरातील लोकांसाठी विविध ठिकाण हुन मदतीचा ओघ सुरु झाला आहे अशावेळी प्रश्न होता तो त्या गावातील मुक्या जनावरांचा त्यांच्या चार्याचा हा गंभीर प्रश्न जेव्हा म्हसवड येथील माणदेशी फाऊंडेशनला समजला तेव्हा या फाऊंडेशनच्या वतीने तात्काळ कुरुंदवाड येथे सर्व्हे करण्यात आला व त्या गावातील जनावरांसाठी त्वरीत पेंढ व रहिवाशांसाठी ५ कि. गव्हाचे पिठ देण्यात आले, स्वत: दुष्काळाच्या झळा सोसत असणार्या माणदेशी फाऊंडेशनच्या या दातृत्वाबद्दल कुरुंदवाडकरांनी हात जोडुन आभार मानताना त्यांचे डोळे अक्षरशा पानावल्याने माणुसकी आजही जिवंत असल्याचे दिसुन आले.
यावेळी बोलताना माणदेशी फाऊंडेशनच्या प्रमुख श्रीमती चेतना सिन्हा म्हणाल्या की माण तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे त्यासाठी शासनस्तरावरुन पाण्याचे टँकर व जनावरांच्या चारा छावण्या सुरु आहेत, दुष्काळाचे हे संकट माण तालुक्यातील जनतेला नवे नसले तरी अद्यापही या तालुक्यात पाऊसच पडला नसल्याने तालुक्यातील शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे, शेतकर्यांवर ओढवणार्या दुष्काळाच्या अस्मानी संकटाचा अंदाज बांधुन केवळ त्यांचे पशुधन जगावे यासाठी आम्ही माणदेशी फाऊंडेशनच्या वतीने जानेवारी महिन्यातच जनावरांची चारा छावणी सुरु केली असुन ती अद्यापही सुरु आहे, या चारा छावणीत सध्या सुमारे ७ हजार जनावरे तर २ हजार शेतकरी निवासी रहात आहेत, मात्र सांगली, कोल्हापुर जिल्ह्यात आलेला महापुर हा अत्यंत भयानक व ह्रदयस्पर्शी असा आहे, या महापुराने अनेकांचे संसार वाहुन गेले आहेत तर अनेकांची घरे पडली आहेत, अनेक शेतकर्यांची मुकी जनावरे ही महापुराच्या पाण्यात वाहुन गेली आहेत, आता महापुर ओसरला असला तरी त्या महापुराने दिलेल्या जखमा ओल्या आहेत या महापुरातील जनतेला दिलासा देण्यासाठी शासनाबरोबरच अनेक संस्था मदतीचा हात घेवुन पुढे येत आहेत, ही वस्तुस्थिती असली तरी खरा प्रश्न आहे तो येथील मुक्या जनावरांचा या महापुरात कुरुंदवाड करांनी मोठे साहस दाखवत आपली जनावरे बिल्डिंग वर नेहुन त्यांचा जिव वाचवला आहे, मात्र आता या जनावरांना खाण्यासाठी कोठेच चारा उपलब्ध होत नाही त्यामुळे महापुराचा भयानक सामना करीत वाचवलेली मुकी जनावरे ही भुक बळी ची शिकार ठरु नये यासाठी कुरुंदवाड शहरातील शेतकरी चिंताग्रस्त असले तरी त्यांनी आता काळजी करु नये त्यांच्या सोबत आता माणदेशी फाऊंडेशन आहे, महापुरात वाहुन गेलेले संसार पुन्हा उभे राहतील, पडलेली घरे पुन्हा बांधली जातील पण तळहाताच्या फोडाप्रमाणे संभाळलेली जनावरे महापुराच्या अस्मानी संकटातुन मोठ्या पराक्रमाने शेतकर्यांनी वाचवली असुन ती मुकी जनावरे जगली पाहिजेत यासाठी माणदेशी फाऊंडेशन ही जनावरे आजपासुन येथील परिस्थिती सुरळीत होत नाही तोवर दत्तक घेत असुन यापुढे शेतकर्यांनी आपल्या जनावरांची चिंता सोडुन आपला वाहुन गेलेला संसार उभारण्यासाठी प्रयत्न करावेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.