ETV Bharat / state

दहा हजारांची लाच घेताना मंडलाधिकारी अटकेत - साताऱ्यात मंडल अधिकारी अटकेत

थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या मिळकतीचा ताबा घेतल्याचा अहवाल देण्यासाठी मदतनीसामार्फत 10 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सातारा येथील मंडलाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. शिवाजी बबन पिसाळ असे अधिकाऱ्याचे नाव आहे.

लाच
author img

By

Published : Aug 23, 2019, 2:30 AM IST

सातारा- थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या मिळकतीचा ताबा घेतल्याचा अहवाल देण्यासाठी मदतनीसामार्फत 10 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सातारा येथील मंडलाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. मंडलाधिकारी शिवाजी बबन पिसाळ (रा. सत्यमनगर, खेड) व खासगी व्यक्ती सतीश किसन कुंभार (रा. करंजे) या दोघांना बुधवारी दुपारी सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. विशेष म्हणजे शिवाजी पिसाळ याच्यावर आतापर्यंत हा दुसरा ट्रॅप झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा येथील आयडीबीआय बँकेने गोडोली येथील हॉटेल स्माईलच्या मालकाला तारणापोटी 3 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. संबंधित कर्जाची फेड वेळेत न केल्याने ते हॉटेल आयडीबीआय बँकेने जप्त केले होते. जप्ती प्रक्रिया पार पडल्यानंतर हॉटेलच्या मिळकतीवर ताबा घेतल्याचा अहवाल मिळण्यासाठी बँकेच्यावतीने सातारा मंडलाधिकार्‍यांकडे अर्ज करण्यात आला. या अर्जानुसार अहवाल तयार करुन तो सातारा तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी मंडलाधिकारी शिवाजी पिसाळ आणि खासगी मदतनीस सतीश कुंभार या दोघांनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच दिल्याशिवाय पिसाळ, कुंभार अहवाल तयार करणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबी विभागाने त्यानुसार याची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान पिसाळ, कुंभार यांनी 10 हजार रुपयांवर तडजोड केली. लाचेची रक्कम बुधवारी घेण्याचे ठरल्यानंतर दुपारी करंजे येथे सापळा रचण्यात आला. याठिकाणी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर कुंभार आणि पिसाळ यांना पकडण्यात आले. सातार्‍यात एसीबीचा ट्रॅप झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. यातील पिसाळ याच्याविरुध्द यापूर्वीही एसीबीचा ट्रॅप झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, संशयित दोघांना अटक केल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

Intro:सातारा थकीत कर्जापोटी जप्त केलेल्या मिळकतीचा ताबा घेतल्याचा अहवाल देण्यासाठी मदतनीसामार्फत 10 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी सातारा येथील मंडलाधिकारी शिवाजी बबन पिसाळ (रा. सत्यमनगर, खेड) व खासगी व्यक्ती सतीश किसन कुंभार (रा. करंजे) या दोघांना बुधवारी दुपारी सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दरम्यान, मंडलाधिकारी शिवाजी पिसाळ याच्यावर आतापर्यंत हा दुसरा ट्रॅप झाला असल्याची माहिती समोर आली आहे.Body:याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथील आयडीबीआय बँकेने गोडोली येथील हॉटेल स्माईलच्या मालकाला तारणापोटी 3 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. संबंधित कर्जाची फेड वेळेत न केल्याने ते हॉटेल आयडीबीआय बँकेने जप्त केले होते. जप्ती प्रक्रिया पार पडल्यानंतर हॉटेलच्या मिळकतीवर ताबा घेतल्याचा अहवाल मिळण्यासाठी बँकेच्यावतीने सातारा मंडलाधिकार्‍यांकडे अर्ज करण्यात आला.

या अर्जानुसार अहवाल तयार करुन तो सातारा तहसीलदारांकडे पाठवण्यासाठी मंडलाधिकारी शिवाजी पिसाळ आणि खासगी मदतनीस सतीश कुंभार या दोघांनी 15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच दिल्याशिवाय पिसाळ, कुंभार अहवाल तयार करणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी सातारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबी विभागाने त्यानुसार याची पडताळणी केली. पडताळणी दरम्यान पिसाळ, कुंभार यांनी 10 हजार रुपयांवर तडजोड केली. लाचेची रक्कम बुधवारी घेण्याचे ठरल्यानंतर दुपारी करंजे येथे सापळा रचण्यात आला. याठिकाणी 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर कुंभार आणि पिसाळ यांना पकडण्यात आले.  सातार्‍यात एसीबीचा ट्रॅप झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली. यातील पिसाळ याच्याविरुध्द यापूर्वीही एसीबीचा ट्रॅप झाला असल्याची माजहती समोर आली आहे. दरम्यान, संशयित दोघांना अटक केल्यानंतर गुरुवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

(satara lcb Use old video...)Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.