सातारा - साताऱ्यात कौटुंबिक वादातून ( Family disputes ) काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. भावाने आपल्या सख्ख्या भावाच्या दहा महिन्याच्या बाळाला विहिरीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ( man throw ten month old baby in well )आहे. यात त्या बाळाचा मृत्यू ( baby died ) झाला. ही घटना सातारा एमआयडीसी ( Satara MIDC ) परिसरातील कोडोली-दत्तनगरमधूनसमोर आली आहे. या घटनेत शलमोन मयूर सोनवणे या बाळाचा मृत्यू झाला असून संशयित चुलता अक्षय मारूती सोनवणे यास सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कौटुंबिक वादात चिमुकल्याचा हकनाक बळी - सातारा एमआयडीसी परिसरातील दत्तनगरमध्ये सकाळी हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आई-वडील आपल्याला त्रास देतात, म्हणून संशयित अक्षय सोनवणे याने भावाच्या मुलाला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने बाहेर आणले. परिसरातील एका विहिरीजवळ आल्यानंतर त्याला विहिरीत टाकले. त्यात बाळाचा मृत्यू झाला असल्याची माहिती सातारा शहर पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिली आहे. सध्या पोलीस संशयिताची कसून चौकशी करत आहेत.
आई-वडीलांचा हृदय पिटाळून टाकणारा आक्रोश - ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर मृत बाळाच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिटाळून टाकत होता. चुलत्याने केलेल्या या संतापजनक कृत्यामुळे सातारा परिसरात संतापाची लाट उसळली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा शहर पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी मयूर मारूती सोनवणे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा - Model Molestation Case : मुंबईत स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहता विरुद्ध मॉडेलचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल