सातारा - वाई तालुक्यातील नागेवाडी येथे मुकींद राम बनसोडे(वय 50) यांना टाळेबंदीच्या काळात एकटे राहिल्याने नैराश्य आले. त्यातून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 27 डिसेंबरला घडली आहे.
शांताराम बनसोडे यांचे भाऊ मुकींद हे नागेवाडी येथे राहत होते. त्याच्या पत्नीचे दोन वर्षांपूर्वी अल्पआजाराने निधन झाले. त्यामुळे ते एकटेच मोलमजुरी करून राहत होते. टाळेबंदीच्या काळात आणखी एकटेपणा जाणवत असल्याने ते मानसिक तणावात होते.
हेही वाचा-केंद्राकडून कांद्याच्या निर्यातीवरील निर्बंध रद्द
घरातून गेले होते निघून
सहा महिन्यांपूर्वी ते कुठेतरी निघून गेले होते. दोन दिवसांपूर्वी घरात गळफास घेऊन मुकींद यांनी आत्महत्या केली. नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. लॉकडाऊनच्या काळात डोक्यावर परिणाम झाल्याने आत्महत्या केल्याची नोंद वाई पोलिसात करण्यात आली आहे. याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक एस. एस. जाधव करत आहेत. नागेवाडी परिसरात खळबळ उडाली असून या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
हेही वाचा-टिप्स इंडस्ट्रीजचे संगीत व व्हिडिओ फेसबुकसह इन्स्टाग्रामवर वापरता येणार; दोन्ही कंपन्यांमध्ये करार