ETV Bharat / state

माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांचा राजीनामा; भाजप प्रवेशाची चर्चा - जयकुमार गोरे

भाजपची महाभरती कायमच आहे. साताऱ्यातील माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार रावल यांनीही आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा देखील रंगत आहेत.

विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवला
author img

By

Published : Aug 30, 2019, 8:45 PM IST

सातारा - माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आमदार गोरेंनी आपला राजीनामा सादर केला. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते.

आमदार गोरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भाजपने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला अगोदरच सुरुंग लावला आहे. आता काँग्रेस आमदरा जयकुमार गोरेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने माण मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आमदार गोरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माण तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात गोरे भाजप प्रवेश करतील असेही बोले जात आहे.

लोकसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपमध्ये पाठविण्यात तसेच त्यांना लोकसभा निवडणूकीत निवडून आणण्यात आमदार गोरेंनी मुख्य भूमिका पार पाडली होती. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशावेळीच आ. गोरेंचाही भाजप प्रवेश निश्चित झाला होता. त्यांच्याबरोबर जिल्ह्यातील काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीपाठोपाठ सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा गट आ. गोरेंबरोबर भाजपवासी होणार असल्याने जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

आमदार गोरे यांच्या वरती अनेक गुन्हे दाखल आहेत. खंडणी, अपहरण, विनयभंग असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यांच्यावर आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी आमदार गोरे हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची उलट सुलट चर्चा सातारा जिल्ह्यात रंगली आहे.

Intro:सातारा माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आ. गोरेंनी आपला राजीनामा सादर केला. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते.

Body:आ. गोरे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. भाजपने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला अगोदरच सुरुंग लावला आहे. आता काँग्रेस आ.जयकुमार गोरेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने माण मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. आ. गोरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माण तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांच्या भूमिपूजन समारंभात आ. गोरे भाजप प्रवेश करतील असे बोले जात आहे.

लोकसभा निवडणूकीदरम्यान काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपमध्ये पाठविण्यात तसेच त्यांना लोकसभा निवडणूकीत निवडून आणण्यात आ. गोरेंनी मुख्य भूमिका पार पाडली होती. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशावेळीच आ. गोरेंचाही भाजप प्रवेश निश्चित झाला होता. आ. जयकुमार गोरे यांच्या बरोबर जिल्ह्यातील काँग्रेसचे बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीपाठोपाठ सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा गट आ. गोरेंबरोबर भाजपवासी होणार असल्याने जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

(आमदार गोरे यांच्या वरती अनेक गुन्हे देखील दाखल आहेत खंडणी,अपहरण, विनयभंग हे गुन्हे मागे घेण्यासाठी आमदार गोरे हे भाजपा मध्ये प्रवेश करत असल्याची उलट सुलट चर्चा सातारा जिल्ह्यात रंगली आहे.)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.