ETV Bharat / state

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरची बाजी; पृथ्वीराज पाटीलने जिंकली मानाची गदा - पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी बातमी

महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari ) किताब लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरला चिटपत केले ( Prithviraj Patil Defeated Vishal Bunkar ) आहे. तब्बल 21 वर्षांनंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा मान मिळाला आहे.

Maharashtra Kesari
Maharashtra Kesari
author img

By

Published : Apr 9, 2022, 7:36 PM IST

Updated : Apr 9, 2022, 8:36 PM IST

सातारा - 64 वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari ) किताब स्पर्धा साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलने मुंबईच्या विशाल बनकरला चिटपत केले ( Prithviraj Patil Defeated Vishal Bunkar ) आहे. पृथ्वीराजने विशाल बनकरचा स्पर्धेत 5-4 अशा गुणांनी पराभव केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari ) स्पर्धा झाली नव्हती. परंतु, कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने यंदाच्या महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari ) स्पर्धेला साताऱ्यात सुरुवात झाली. त्यानंतर आपल्या समोरील पैलवानांचा पराभव करत विशाल बनकर आणि पृथ्वीराज पाटील अंतिम लढतीसाठी एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यांच्या लढतीकडे अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र, आता कुस्ती स्पर्धेचा अंतिम निकाल हाती आला आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा

पृथ्वीराजची विशालवर मात - या कुस्ती स्पर्धेत 86 ते 125 किलो वजनी गटाच्या गादी आणि माती विभागातील अंतिम फेरीत विजयी झालेले मल्ल एकमेकांविरोधात लढणार होते. अंतिम सामन्यात पोहचलेले पृथ्वीराज आणि विशाल दोघेही कोल्हापूरच्या तालमीत तयार झालेले मल्ल आहेत. मात्र, विशाल मुंबईचे तर, पृथ्वीराज कोल्हापूरचे नेतृत्व करत होता. अटीतटीच्या झालेल्या या लढतीमध्ये सुरुवातील विशालने आघाडी घेत 4-3 अशी आघाडी घेतली होती. पण, पृथ्वीराजने विशालवर मात करुन 5-4 असे गुण मिळवत महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेवर आपले नाव कोरले ( Prithviraj Patil Win Maharashtra Kesari ) आहे.

कोण आहे पृथ्वीराज पाटील?

पृथ्वीराज पाटील हा मूळचा पन्हाळा तालुक्यातील देवठाणेचा पैलवान आहे. कोल्हापूरातील जालिंदर आबा मुंडे शाहू कुस्ती केंद्रात तो लहानाचा मोठा झाला आहे. सध्या पृथ्वीराज आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटमध्ये आपली ट्रेनिंग घेत आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : जाणून घ्या अटकेपार कामगिरी करणाऱ्या कराडकर मल्लांबद्दल!

Last Updated : Apr 9, 2022, 8:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.