ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळ : महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 94.7 मिलीमीटर पाऊस - Cyclone Tauktae live news

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. या काळात सरासरी एकूण 22.53 मिली मीटर पाऊसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 94.7 मिली मीटर पाऊस झाला.

महाबळेश्वर
महाबळेश्वर
author img

By

Published : May 17, 2021, 8:28 PM IST

सातारा - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. या काळात सरासरी एकूण 22.53 मिली मीटर पाऊसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 94.7 मिली मीटर पाऊस झाला.

मोठी वित्तहानी

साताऱ्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण 22.53 मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटणमध्ये पाऊस झाला नाही तर माण, खंडाळा, कोरेगाव, खटाव या तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. या पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यासह अनेक ठिकाणी महावितरण कंपनीचे विजेचे पोल उन्मळून पडले. तसेच अनेक ठिकाणी विज वहन यंत्रणेचे लाखोंचे नुकसान झाले. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या दुर्घटना घडल्या. मात्र सुदैवाने जीवितहानीचा एकही प्रकार घडला नाही.

जिल्ह्यातील पाऊस
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मिली मीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
सातारा- 19.10 मि.मी.
जावळी- 32.04 मि.मी.
पाटण- 35.08 मि.मी.
कराड- 32.92 मि.मी.
कोरेगाव- 6.11 मि.मी.
खटाव- 5.81 मि.मी.
माण- 0.42 मि.मी.
फलटण- 0.00 मि.मी.
खंडाळा- 2.45 मि.मी.
वाई – 18.14 मि.मी.
महाबळेश्वर- 94.7 मि.मी.

हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ: मुंबईतील परिस्थितीचा ग्राउंड झिरो रिपोर्ट

हेही वाचा - Cyclone Tauktae : मुंबापुरीला चक्रीवादळाचा तडाखा.. मुसळधार पावसाने मुंबई 'स्लो ट्रॅक'वर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.