ETV Bharat / state

Lovers Jumped Into Lake : प्रेमी युगुलानं बंधाऱ्यात मारली उडी, शोधकार्य सुरू - बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

सातारा शहर आणि उपनगरात राहणाऱ्या राहणाऱ्या प्रेमी युगुलाने बंधाऱ्यात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे सातारा शहरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

Lovers Jumped Into Lake
Lovers Jumped Into Lake
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 1, 2023, 11:02 PM IST

सातारा : प्रेमी युगुलाने बंधाऱ्यात उडी मारल्याची खळबळजनक घटना साताऱ्यातील कोंडवे गावच्या हद्दीत रविवारी सायंकाळी घडली आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा थांगपत्ता लागलेला नव्हता. राजाराम गायधने (वय २६, रा.दिव्‍यनगरी, सातारा) (नाव बदलेलं आहे) आणि जोती गायकवाड (नाव बदलेलं आहे) (वय २३, रा. सातारा) अशी बंधाऱ्यात उडी मारलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत

बंधाऱ्यात प्रेमी युगुलाचा शोध सुरू : कोंडवे (ता. सातारा) गावच्या हद्दीतील बंधार्‍यात प्रेमवीरांनी उड्या घेतल्‍याच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बंधाऱ्यात शोधकार्य सुरू करण्यात आले. रात्री उशीरापर्यंत दोघांचा शोध सुरु होता.

दोघांनी बंधाऱ्यात मारली उडी : साताऱ्यातील दिव्‍यनगरी रस्‍त्‍यावरील कोंडवे गावच्या हद्दीत एक प्रेमी युगुल दुचाकीवरुन आले होते. आणखी एकजण त्यांच्या सोबत होता. तरूणीशी तरूणाने चर्चा केली. चर्चा झाल्‍यानंतर अचानक तिने बंधार्‍यात उडी मारली. पाठोपाठ तरूणानेही उडी मारली. पाहता पाहता दोघेही बंधार्‍यात बुडाले. या घटनेने भेदरेल्‍या काही जणांनी तात्‍काळ सातारा ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलीस तात्‍काळ घटनास्‍थळी दाखल झाले.

आत्महत्येच्या प्रयत्न : प्रेमी युगुलाने बंधाऱ्यात उडी मारून केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे सातारा आणि दिव्यनगरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांच्या शोधासाठी पोलिसांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले आहे. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.

हेही वाचा -

  1. Pune Crime News : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर 2 कोटीचे अमली पदार्थ जप्त; पोलिसांचा तपास सुरू
  2. Stone Pelting In Shahada : शहादा दगडफेक प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 200 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
  3. Woman Cop Molested धार्मीक कार्यक्रमात महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग; पोलिसांनी दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांसह तिघांना घेतलं ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.