सातारा : डरकाळ्या फोडणारा बिबट्या जखमी आहे की कशामध्ये फसलाय, याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने थर्मल सेन्सर ड्रोन कॅमेऱ्याचा (Thermal sensor drone camera) वापर केला. पुणे येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने केलेल्या ड्रोन चित्रीकरणात नर-मादी बिबट्याची जोडी ही प्रजननासाठी एकत्र आल्याची बाब स्पष्ट झाली. जिल्ह्यात अशा प्रकारची रेस्क्यू मोहीम ठरली.(Leopards in Satara)
जिल्ह्यात प्रथमच थर्मल सेन्सरचा वापर : बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे तो जखमी अथवा अडचणीत असावा म्हणून वनविभागाने डोंगर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबवले. त्यासाठी जिल्ह्यात प्रथमच थर्मल सेन्सर ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला गेला. कराड वनविभाग आणि पुणे येथील रेस्क्यू टीमने केलेल्या चित्रीकरणात दोन बिबटे दिसून आले. नर आणि मादी बिबट्याच्या जोडीचा वावर स्पष्ट झाला. तसेच बिबट्या जखमी अथवा अडचणीत नसल्याचे स्पष्ट झाले.
प्रजननासाठी बिबट्याची जोडी एकत्र : ड्रोनव्दारे केलेल्या पाहणीत नर आणि मादी बिबट्याची जोडी एकत्र फिरताना दिसून आली. सध्या बिबट्याचा प्रजनन काळ सुरू आहे. त्यामुळे अजून चार-पाच दिवस बिबटे एकत्र राहू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी वाघदरा परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन कराडचे वनपरिक्षेत्र अधिकारी तुषार नवले यांनी केले.
रेस्क्यू टीमची मोहिम : उपवसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनंरक्षक महेश झांजूर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले यांचे मार्गदर्शनाखाली पाचारण करण्यात आलेल्या पुणे येथील रेस्क्यू टीमने थर्मल सेंन्सर ड्रोनमधून शोध घेऊन रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले. वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक सचिन खंडागळे, सुभाष गुरव, वनसेवक सतिश पाटील आणि रेस्क्यू टीमने ही मोहीम राबवली.