ETV Bharat / state

Koyna Power Plant : कोयना वीज प्रकल्पाच्या अधिजल भुयारातून पाण्याची गळती; सह्याद्रीच्या डोंगरातून वाहतंय पाणी, 'हे' आहे कारण

कोयना वीज प्रकल्पाच्या बोगद्यातून पाण्याची गळती होत (Leakage of water from Koyna power plants overflow tunnel) असल्याने, पोफळीच्या पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगेतून धबधब्यासारखे पाणी (Water flows from Sahyadri mountains) वाहत असल्याने, खळबळ माजली आहे. मात्र, यामुळे वीज प्रकल्पाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव आणि कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक (Former Chief Engineer of Koyna Project Deepak Modak) यांनी दिला आहे.

Koyna Power Plant
कोयना वीज प्रकल्प
author img

By

Published : Nov 9, 2022, 5:21 PM IST

सातारा : कोयना वीज प्रकल्पाच्या बोगद्यातून पाण्याची गळती होत (Leakage of water from Koyna power plants overflow tunnel) असल्याने; पोफळीच्या पूर्वेकडील सह्याद्रीच्या डोंगररांगेतून धबधब्यासारखे पाणी (Water flows from Sahyadri mountains) वाहत आहे, यामुळे खळबळ माजली आहे. मात्र, यामुळे वीज प्रकल्पाला कोणताही धोका नसल्याचा निर्वाळा जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव आणि कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी दिला आहे. उल्लोळ विहीर अथवा पोफळीतील सर्जवेलला गळती लागून पाणी ईव्हीटीमध्ये येऊन झिरपत आहे. तेच पाणी डोंगरातून वाहत असल्याचे मोडक (Former Chief Engineer of Koyna Project Deepak Modak) यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया देतांना मुख्य अभियंता दीपक मोडक

सर्जवेलचे बांधकाम 1960 सालातील : कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्‍या टप्प्यासाठी नवजा टॉवरमधून निघणाऱ्या अधिजल भुयाराच्या शेवटी एक उल्लोळ विहीर किंवा सर्जवेल बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे दाब बोगद्यातून पाणी पहिल्या व दुसर्‍या टप्प्याच्या वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल १९६० साली बांधण्यात आली असून; सह्याद्रीच्या कातळात शंभर मीटर खोल खोदली असल्याचे दीपक मोडक यांनी सांगितले.

विहिरीच्या अस्तरीकरणाला तडे : अधिजल भुयाराच्या विहिरीला अर्ध्या मीटर रुंदीचे काँक्रीट अस्तरीकरण केले आहे. या विहिरीला साठ वर्षे झाली असून, तिने अनेक भूकंपाचे धक्के पचवले आहेत. मात्र, आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्यामुळे ‘सर्जवेल’मधून झिरपलेले पाणी इमर्जन्सी व्हॉल्व्ह टनेल (ईव्हीटी) किंवा आपत्कालीन झडपेद्वारे भुयारामध्ये जाते आणि तिथून ते वाहत जाऊन डोंगराच्या उतारावरून बाहेर पडत आहे.

प्रतिसेकंद तीन घनफूट पाणी जातयं वाया : गेल्या चार-पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. यामुळे वीजगृहाला अथवा डोंगराला कोणताही धोका नाही. केवळ पाणी वाया जात आहे. साधारणत: तीन घनफूट प्रतिसेकंद एवढे पाणी वाहत जात असावे. पोफळी सर्जवेलची जागा दुर्गम ठिकाणी आहे. त्याठिकाणी मशिनरी नेणे सोपे नाही. ही दुरूस्ती केवळ उन्हाळ्यातच करणे शक्य आहे आणि त्यासाठी वीजनिर्मिती बंद ठेवावी लागेल. त्यामुळे दुरूस्तीचे काम चार-पाच वर्षे रेंगाळले असल्याचे, दीपक मोडक यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.