ETV Bharat / state

फलटण येथील घरफोडीचा छडा लावण्यात एलसीबीला यश; दोघांकडून ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - सातारा क्राईम न्यूज

सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेला फलटण येथील घरफोडीचा छडा लावण्यात यश आले आहे. पोलिसांनी सापळा रचत दोघांकडून ४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून ज्यांच्या घरी चोरी झालेय त्यांनी पोलिसांनी संशयितांकडून हस्तगत केलेल्या मुद्देमालाची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

lcb satara
स्थानिक गुन्हे शाखा सातारा
author img

By

Published : Aug 15, 2020, 3:59 AM IST

सातारा- घरफोडीत चोरलेले दागिने विकण्यासाठी आलेल्या दोन संशयितांना सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने फलटण येथे सापळा रचून शिताफीने पकडले. त्यांच्याकडून 4 लाख 11 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. मुकेश माणिक जाधव (वय ३५) व सूरज राजू जाधव (वय २३, दोघेही रा. मलटण, ता. फलटण) अशी संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, बारामती जि. पुणे बाजुकडून टाटा छोटा हत्ती वाहनातून (एमएच 10 एक्यू 680) दोघेजण चोरीचे दागिने विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या पथकाने सोमवार पेठ, फलटण येथे बारामती रोडलगत कॅनॉल पुलावर सापळा रचला. यावेळी संबंधित टाटा एस छोटा हत्ती गाडी त्याठिकाणी आली. पोलिसांच्या पथकाने गाडी थांबवून त्यातील दोन संशयितांची झडती घेतली.

पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये त्यांच्याकडे सोन्याचे गंठण, पेन्डलस त्यासोबत डायमंडमधील डिझाईन, एक स्पेशल सोन्याचे नेकलेस गोल पेन्डलसह त्यात डायमंडमधील डिझाईन, दोन गोलाकार डिझाईनच्या सोन्याच्या बांगड्या, कानातील दोन सोन्याचे टॉप, एक सोन्याचे बिस्कीट, चांदीची साड्याची अंगठी, दोन चांदीचे पायाचे बोटातील बिछवे असे एकूण २ लाख ३३ हजार रुपये किंमतीचे सोने व १३ हजार रुपयांचे चांदीचे दागिणे असे २ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज मिळून आला.

स्थानिक गुन्हे शाखेने या दागिन्यांबाबत केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी फलटण शहरामध्ये मार्च महिन्यामध्ये चोरी केली असल्याचे सांगितले. संशयिताने सांगितल्यानुसार पोलिसांनी खात्री केली असता याबाबतचा गुन्हा फलटण पोलीस ठाण्यात दाखल होता. यानंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन व सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून 4 लाख 11 हजार 190 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त मुद्देमालापैकी सोन्याचे नेकलेस, सोन्याच्या दोन बांगड्या, चांदीची अंगठी व पायातील बिछवे यांचे मालक मिळून आले नाहीत. तथापि, फलटण भागातील ज्यांच्या घरी चोरी झालेली आहे, त्यांनी या मुद्देमालाबाबत खात्री करुन घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदसिंग साबळे, उपनिरीक्षक प्रसन्न जहाड, सहाय्यक फौजदार ज्योतीराम बर्गे, उत्तम दबडे, हवालदार सुधीर बनकर, मुबीन मुलाणी, विनोद गायकवाड, शरद बेबले, मोहन नाचन, संतोष जाधव, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, वैभव सावंत, केतन शिंदे, अनिल खटावकर, संजय जाधव, विजय सावंत, विद्या पवार, तनुजा शेख, तसेच फलटण शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल भंडारी व नितीन भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.