ETV Bharat / state

Gautami Patil : चर्चा तर होणारच! चिमुकल्याच्या वाढदिवसाला वडिलांनी ठेवला गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम - गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम

सातार्‍यातील खोजेवाडी गावातील पाच वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी चक्क गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम ठेवल्याने जिल्ह्यात या वाढदिवसाची जोरदार चर्चा आहे. नृत्यातील अश्लिल हावभावामुळे दोन महिन्यांपूर्वी गौतमी विरोधात सातारा न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता.

Gautami Patil Lavani Dance
Gautami Patil Lavani Dance
author img

By

Published : Feb 24, 2023, 8:13 PM IST

मल्हार शिंदे या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम

सातारा : सातार्‍यातील खोजेवाडी गावातील पाच वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी 'होऊ दे खर्च' म्हणत चक्क गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम ठेवल्याने जिल्ह्यात या वाढदिवसाची जोरदार चर्चा आहे. नृत्यातील अश्लिल हावभावामुळे दोन महिन्यांपूर्वी गौतमी विरोधात सातारा न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यानंतर तिचा साताऱ्यात झालेला हा दुसरा कार्यक्रम आहे.

गौतमीच्या नृत्यावर चाहते फिदा : सातार्‍याजवळच्या खोजेवाडीसारख्या छोट्या गावात लावणी स्टार गौतमी पाटीलचा कार्यक्रम असल्याचे समजताच तरूणांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला गर्दी केली होती. खोजेवाडीतील मल्हार शिंदे या पाच वर्षाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडीलांनी हा कार्यक्रम ठेवला होता. ‘सबसे कातील, गौतमी पाटील’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमीने आपल्या अदाकारीने चाहत्यांना घायाळ केले. गौतमीच्या कार्यक्रमामुळे मल्हार शिंदे या चिमुकल्याच्या वाढदिवसाची संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चा आहे.

गौतमी एका शो चे 'इतके' घेते मानधन : सध्या लावणी म्हटले की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येते ते गौतमी पाटीलचे. गौतमीच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीच्या कार्यक्रमाला गर्दी करतात. काही महिन्यांपूर्वी तिच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आणि तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून यशाच्या शिखरावर असलेली गौतमी तिच्या एका शो साठी आता दीड ते दोन लाख रूपये घेते.

साताऱ्यात गौतमी विरोधात याचिका : सातारा शहरानजीकच्या शेंद्रे-सोनगाव येथे 21 डिसेंबर 2022 रोजी गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात अश्लिल चाळे केल्याचा आरोप करत सातार्‍यातील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी गौतमीच्या विरोधात कलम 294 प्रमाणे गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचा अर्ज सातारा न्यायालयात दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने गौतमीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

अश्लील नृत्यामुळे गौतमी वादात : अश्लील हावभावामुळे गौतमी पाटील ही नेहमीच चर्चेत असते. अंगविक्षेप करुन नाचतानाचे गौतमी पाटीलचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अश्लिल हावभावांमुळे गौतमी पाटीलच्या डान्स कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणी यापुर्वी सातत्याने होत होती. त्यामुळे गौतमी पाटील ही आपल्या नृत्य शैलीमुळे सतत वादात सापडत होती.

कान उघाडणीनंतर मागितली माफी : अजित पवार यांनी गौतमीच्या अश्लिन नृत्याबद्दल तिची कानउघाणी केल्यानंतर तिने जाहीर माफी मागितली. तसेच तिने आपल्या नृत्य शैलीत देखील बदल केला. माझा कार्यक्रम पाहण्यासाठी फक्त पुरुष नाही तर महिला देखील येतात. मी चुकले होते, याबाबत मी माफी मागितली आहे. मी एक कलाकार आहे. मी अश्लिल काही करत नाही, असे सांगत गौतमीने खुलासा केला होता.

कार्यक्रमात आढळला होता मृतदेह : काही महिन्यांपूर्वी सांगली येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमादरम्यान एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या मृत्यू प्रकरणी गौतमी पाटील हिच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्र विकास सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष प्रशांत सदामते यांनी सांगली पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली होती.

हेही वाचा - Gautami Patil Programme : लावणी स्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; पोलिसांनी प्रेक्षकांना चोपले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.