ETV Bharat / state

कृष्णा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेबद्दल व्हीएसआयचा पुरस्कार जाहीर

author img

By

Published : Jan 9, 2021, 3:27 AM IST

साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार दिले जातात. सन 2019-20 या गळीत हंगामात कृष्णा कारखान्याने शंभर टक्क्याहून अधिक गाळप क्षमतेचा वापर करत 12.61 टक्के इतका साखर उतारा घेतला आहे. नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेत 5.98 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Krishna factory awarded VSI for technical efficiency
कृष्णा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेबद्दल व्हीएसआयचा पुरस्कार जाहीर

कराड (सातारा) - रेठरे बुद्रुक येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्ही. एस. आय.) 2019-20 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेबद्दल तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जाहीर केला आहे. तर, कारखान्याचे सभासद शेतकरी अशोक जाधव यांना प्रथम क्रमांकाचा ऊस भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

Krishna factory awarded VSI for technical efficiency
कृष्णा सहकारी साखर कारखाना

साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार दिले जातात. सन 2019-20 या गळीत हंगामात कृष्णा कारखान्याने शंभर टक्क्याहून अधिक गाळप क्षमतेचा वापर करत 12.61 टक्के इतका साखर उतारा घेतला आहे. नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेत 5.98 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिड्यूस्ड ओव्हरऑल रिकव्हरी 86.96 टक्के, तर रिड्यूस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन 95.77 टक्के राहिले आहे. साखर तयार करण्यासाठी फक्त 15.39 टक्के इतकाच बगॅसचा वापर कारखान्याने केला आहे. याची दखल घेत व्ही. एस. आय. ने सर्वोत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार कृष्णा कारखान्यास जाहीर केला आहे.

दरम्यान, कृष्णा कारखान्याचे टेंभू (ता. कराड) येथील सभासद अशोक जाधव यांना खोडवा हंगामात उसाचे उच्चांकी उत्पादन घेतल्याबद्दल प्रथम क्रमांकाचा ऊस भूषण पुरस्कारही जाहीर झाला आहे. त्यांनी खोडवा हंगामात हेक्टरी 292.50 मे. टन ऊसाचे उत्पादन घेतले आहे. या दोन्ही पुरस्कारांचे वितरण पुणे येथे होणार आहे.

हेही वाचा - भारताचा पहिला फॉर्म्युला 2 रेसर जेहान दारुवालाची एक्स्लुजीव मुलाखत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.