ETV Bharat / state

कराडमधील कृष्णा हॉस्पिटलचा कोरोना लस संशोधन प्रकल्पात सहभाग..

देशातील 40 निवडक संस्थांमध्ये होणाऱ्या या वैद्यकीय चाचण्यांसाठी गोवा येथील सुप्रसिद्ध ‘सी.आर.ओ.एम. क्लिनिकल रिसर्च ॲन्ड मेडिकल टुरिझम’ या एन.ए.बी.एच. मान्यताप्राप्त संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.

कराडमधील कृष्णा हॉस्पिटलचा कोरोना लस संशोधन प्रकल्पात सहभाग

author img

By

Published : May 11, 2020, 8:03 PM IST

Updated : May 11, 2020, 9:30 PM IST

सातारा - जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनावर पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिबंधक लस विकसित केली आहे. येत्या आठवड्यात देशभरात या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांना प्रारंभ होणार आहे. त्यासाठी निवडलेल्या देशातील 40 वैद्यकीय संशोधन केंद्रांमध्ये कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचाही समावेश करण्यात आला आहे.

धनुर्वात, गोवर, डेंग्यू यासारख्या आजारांवरील लस शोधणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘कोडाजेनिक्स’च्या मदतीने कोरोनावरील लस तयार करण्यास फेब्रुवारी महिन्यातच प्रारंभ केला होता. या लसीच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आता ‘ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ची मान्यता मिळाली आहे. देशातील 40 निवडक संस्थांमध्ये होणाऱ्या या वैद्यकीय चाचण्यांसाठी गोवा येथील सुप्रसिद्ध ‘सी.आर.ओ.एम. क्लिनिकल रिसर्च ॲन्ड मेडिकल टुरिझम’ या एन.ए.बी.एच. मान्यताप्राप्त संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.

कराडमधील कृष्णा हॉस्पिटलचा कोरोना लस संशोधन प्रकल्पात सहभाग

अत्याधुनिक सुविधा, सुसज्ज इन्फ्रास्ट्रक्चर, तज्ज्ञ स्टाफ, वैद्यकीय संशोधनाचा दीर्घ अनुभव या निकषांच्या आधारे कृष्णा हॉस्पिटलची या संशोधन अभ्यास प्रकल्पासाठी निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यात उच्च जोखीम गटातील आरोग्य कर्मचारी, पोलीस, सुरक्षा गार्ड, भाजीपाला, फळ विक्रेते, किराणा माल विक्रेते यांचा या चाचण्यांमध्ये अभ्यास केला जाणार आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. सुजाता पाटील, डॉ. अपर्णा पतंगे व डॉ. सुजाता जाधव या प्रकल्पाच्या समन्वयक आणि ‘सी.आर.ओ.एम.’चे संचालक डॉ. धनंजय लाड आणि डॉ. विजयकुमार पाटील हे सीरम इन्स्टिट्यूटच्यावतीने प्रकल्पाचे निरीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

Last Updated : May 11, 2020, 9:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.