सातारा- कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात होता. भूकंपामुळे कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे. या धक्क्यामुळं कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनानं दिली.
भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात- कोयना धरण परिसरात सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २४ किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील चांदोली (जि. सांगली) गावाच्या पुर्वेस ७ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीत १७ किलोमीटर होती.
यंदाच्या वर्षातील भूकंपाचा सातवा धक्का- पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात झालेल्या भूकंपाने तालुक्यात कोठेही पडझड अथवा हानी झालेली नाही, अशी माहिती कोयना धरण व्यवस्थापनाच्या सुत्रांनी दिली आहे. ८ जानेवारी २०२३ रोजी २.९ रिश्टर स्केल तीव्रतेचा वर्षातील पहिला भूकंप झाला होता. त्यानंतर १ फेब्रुवारी, ६ मे, १६ ऑगस्ट, ७ सप्टेंबर आणि २९ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते.
२०२१ मध्ये जाणवले भूकंपाचे १२८ धक्के - कोयना धरण परिसरात २०२१ सालात सौम्य आणि अतिसौम्य भूकंपाची मालिका सुरू होती. भूकंप मापन केंद्रावर मागील वर्षभरात तब्बल १२८ भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. त्यामध्ये ३ रिश्टर स्केलच्या ११९ आणि ३ ते ४ रिश्टर स्केलच्या ९ धक्क्यांचा समावेश होता. भूकंपांच्या मालिकेमुळे नागरिक भयभीत झाले होते.
जुलै २०२३ मध्ये हिंगोलीत बसले होते भूंकपाचे धक्के- हिंगोलीतल्या औंढा आणि कळमनुरी तालुक्यातील काही भागांमध्ये १५ जुले २०२३ रोजी पहाटे सव्वा पाच आणि सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. तेव्हा ३.६ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली होती. ओंढा आणि कळमनुरी तालुक्यातील पंधरा ते सोळा गावांमध्ये एका पाठोपाठ दोन धक्के जाणवल्यानंतर या भागातील गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
हेही वाचा-