ETV Bharat / state

धक्कादायक : कराडमधील कोरोनाबाधिताच्या संपर्कातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह - latest corona update satara

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कराड तालुक्यातील आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे एकट्या कराड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८, तर सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ झाली आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Apr 21, 2020, 8:34 PM IST

कराड (सातारा) - कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कराड तालुक्यातील आणखी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे एकट्या कराड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ८, तर सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ झाली आहे.

सातारा जिल्ह्यातील तीन कोरोनाग्रस्त रुग्ण पूर्णत: बरे होऊन रुग्णालयातून घरी गेले आहेत, तर दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मागील सहा दिवसांत एकट्या कराड तालुक्यात ६ नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.

कराड रेल्वे स्थानक परिसरातील कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना प्रशासनाने 'क्वारंटाईन' करून त्यांची तपासणी केली. त्यापैकी वनवासमाची आणि आगाशिवनगर-मलकापूर (ता. कराड) येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आठवर पोहोचल्याने कराडकरांची चिंता वाढली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.