ETV Bharat / state

दहशतवाद्यांशी लढताना कराडचा सुपुत्र जम्मू-काश्मिरमध्ये धारातिर्थी; मुंढे गावावर शोककळा

कराड तालुक्यातील मुंढे गावचे सुपुत्र संदीप रघुनाथ सावंत (वय 30) हे जम्मू-काश्मिरमध्ये हुतात्मा झाले आहेत. जम्मू-काश्मिरच्या नौसेरा सेक्टरमध्ये अतिरेकी हल्ल्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या चकमकीत संदीप हुतात्मा झाले. सप्टेंबर 2011 मध्ये ते बेळगाव येथे सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या शहीद होण्याची बातमी समजताच मुंढे गावावर शोककळा पसरली आहे.

Karad jawan martyred in Jammu and Kashmir; Mourning over the village of Mundhe
कराडचा जवान जम्मू-काश्मिरमध्ये शहीद; मुंढे गावावर शोककळा
author img

By

Published : Jan 1, 2020, 7:06 PM IST

Updated : Jan 1, 2020, 8:44 PM IST

सातारा - कराड तालुक्यातील मुंढे गावचे सुपुत्र संदीप रघुनाथ सावंत (वय 30) हे जम्मू-काश्मिरच्या नौसेरा सेक्टरमध्ये अतिरेकी हल्ल्यात मंगळवारी सायंकाळी हुतात्मा झाले. सप्टेंबर 2011 मध्ये ते बेळगाव येथे सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या हुतात्मा होण्याची बातमी समजताच मुंढे गावावर शोककळा पसरली आहे.

संदीप हे 16 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते. जम्मू-काश्मिरमधील नौसेरा सेक्टरमध्ये मंगळवारी सायंकाळी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून ते शहीद झाले. ही बातमी मुंढे ग्रामस्थांना बुधवारी सकाळी 10 वाजता समजली. गावचा सुपूत्र शहीद झाल्याने मुंढे गावावर शोककळा पसरली आहे. संदीप यांचे मोठे भाऊ शशिकांत यांच्याशिवाय कुटुंबातील इतरांना याबाबतही माहिती कळू दिलेली नाही.

नुकतेच झाले होते मुलीचे बारसे..

संदीप यांचा जन्म मुंढे येथे 11 ऑक्टोबर 1990 रोजी झाला होता. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विजयनगर (ता. कराड) येथील प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण कराडच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात झाले होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना तीन महिन्याची मुलगी आहे. मुलीच्या बारशासाठी पाच दिवसांची सुट्टी घेऊन पंधरा दिवसापूर्वी ते गावी आले होते. त्यानंतर ते पुन्हा सीमेवर लढण्यासाठी गेले होते. यावेळी मात्र, त्यांच्याऐवजी, त्यांच्या हुतात्मा होण्याची बातमीच गावी आली.

या घटनेमुळे मुंढे ग्रामस्थ आणि संदीप यांच्या मित्रांना धक्का बसला आहे. संदीप मनमिळाऊ स्वभावाचा होता, अशी आठवण त्यांच्या मित्रांनी सांगितली. त्यांच्या पश्चात वडील रघुनाथ सावंत, आई अनुसया, भाऊ शशिकांत, पत्नी स्मिता आणि मुलगी रिया, असा परिवार आहे.

पार्थिव अद्याप गावामध्ये नाही..

संदीप यांचे पार्थिव गावी कधी येईल, याबाबतही अधिकृत माहिती अद्याप प्रशासनालाही देण्यात आलेली नाही. सातारा जिल्हा सैनिक कल्याण बोर्डालाही फक्त संदीप सावंत हा जवान शहीद झाल्याचे कळविण्यात आले आहे. इतर कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंढे ग्रामस्थ संदीपच्या पार्थिवाच्या प्रतिक्षेत आहेत.

संदीपच्या निधनामुळे गावावर शोककळा असली, तरी गावचा सुपुत्र अतिरेक्यांशी लढताना शहीद झाला, याचा अभिमान देखील ग्रामस्थ आणि युवकांना आहे. बुधवार सकाळीपासूनच ग्रामस्थ संदीपच्या घरामागील मोकळ्या जागेची स्वच्छता करत आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण मुंढे, विमानतळ परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती. परंतु, आपला मुलगा शहीद झाला आहे, याची संदीपच्या कुटुंबीयांना अद्यापही कल्पना नाही.

हेही वाचा : सातारा : मलकापूरच्या जुनेद शेख टोळीतील फरार 5 जणांना मोक्काअंतर्गत अटक

Intro:कराड तालुक्यातील मुंढे गावचा सुपूत्र संदीप रघुनाथ सावंत (वय 30) हा जम्मू-काश्मिरच्या नौसेरा सेक्टरमध्ये अतिरेकी हल्ल्यात मंगळवारी सायंकाळी शहीद झाला. सप्टेंबर 2011 मध्ये तो बेळगाव येथे सैन्य दलात भरती झाला होता. त्यांच्या शहीद होण्याची बातमी समजताच मुंढे गावावर शोककळा पसरली आहे.Body:
कराड (सातारा)  - कराड तालुक्यातील मुंढे गावचा सुपूत्र संदीप रघुनाथ सावंत (वय 30) हा जम्मू-काश्मिरच्या नौसेरा सेक्टरमध्ये अतिरेकी हल्ल्यात मंगळवारी सायंकाळी शहीद झाला. सप्टेंबर 2011 मध्ये तो बेळगाव येथे सैन्य दलात भरती झाला होता. त्यांच्या शहीद होण्याची बातमी समजताच मुंढे गावावर शोककळा पसरली आहे.
  संदीप हा 16 मराठा बटालियनमध्ये कार्यरत होता. जम्मू-काश्मिरमधील नौसेरा सेक्टरमध्ये मंगळवारी सायंकाळी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत गोळी लागून तो शहीद झाला. ही बातमी मुंढे ग्रामस्थांना बुधवारी सकाळी 10 वाजता समजली. गावचा सुपूत्र शहीद झाल्याने मुंढे गावावर शोककळा पसरली आहे. संदीपचा थोरला भाऊ शशिकांत याच्याशिवाय कुटुंबातील इतरांना याबाबतही माहिती कळू दिलेली नाही. 
   संदीप याचा जन्म मुंढे येथे 11 ऑक्टोबर 1990 रोजी झाला होता. त्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विजयनगर (ता. कराड) येथील प्रेमलाकाकी चव्हाण विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण कराडच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात झाले होते. तीन वर्षापूर्वी त्याचा विवाह झाला होता. त्यास तीन महिन्याची मुलगी आहे. मुलीच्या बारशासाठी पाच दिवसांची सुट्टी घेऊन पंधरा दिवसापूर्वी तो गावी आला होता. त्यानंतर तो कर्तव्यावर त्याच्या शहीद होण्याची बातमी आली. त्यामुळे मुंढे ग्रामस्थ आणि संदीपच्या मित्रांना धक्का बसला आहे. संदीप मनमिळाऊ स्वभावाचा होता, अशी आठवण त्याच्या मित्रांनी सांगितली. त्याच्या पश्चात वडील रघुनाथ सावंत, आई अनुसया, भाऊ शशिकांत, पत्नी स्मिता आणि मुलगी रिया, असा परिवार आहे. 
   संदीपचे पार्थिव गावी कधी येईल, याबाबतही अधिकृत माहिती अद्याप प्रशासनालाही देण्यात आलेली नाही. सातारा जिल्हा सैनिक कल्याण बोर्डालाही फक्त संदीप सावंत हा जवान शहीद झाल्याचे कळविण्यात आले आहे. इतर कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंढे ग्रामस्थ संदीपच्या पार्थिवाच्या प्रतिक्षेत आहेत. संदीपच्या निधनामुळे गावावर शोककळा असली, तरी गावचा सुपूत्र अतिरेक्यांशी लढताना शहीद झाला, याचा अभिमान देखील ग्रामस्थ आणि युवकांना आहे. मंगळवारी सकाळपासून ग्रामस्थ संदीपच्या घरामागील मोकळ्या जागेची स्वच्छता करत आहेत. त्या ठिकाणी संपूर्ण मुंढे, विमानतळ परिसरातील नागरीकांनी गर्दी केली होती. परंतु, आपला मुलगा शहीद झालाय, याची संदीपच्या कुटुंबीयांना अद्याप कल्पना नाही. 
  Conclusion:
Last Updated : Jan 1, 2020, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.