ETV Bharat / state

सातारा पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांचा बहिष्कार - journalist ban on press conference of guardian minister in satara

जिल्ह्यात नवनिर्वाचित दोन्ही मंत्र्याच्या उपस्थितीत दिनांक 21 जानेवारीला सकाळी 11 वाजता विविध दैनिकांचे प्रतिनिधी वार्तांकनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गेले होते. आपण फोटो काढा आणि जा. थांबू नका, असा इशाराच पत्रकारांना पालकमंत्र्यांनी दिला.

Breaking News
author img

By

Published : Jan 22, 2020, 9:52 AM IST

सातारा - जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शभुंराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिलीच बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांना या बैठकीस उपस्थित राहण्यास मज्जाव केला. त्यामुळे शहरातील पत्रकार, छायाचित्रकार आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला आहे.

जिल्ह्यात नवनिर्वाचित दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत दिनांक 21 जानेवारीला सकाळी 11 वाजता विविध दैनिकांचे प्रतिनिधी वार्तांकनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गेले होते. आपण फोटो काढा आणि जा. थांबू नका, असा इशाराच पत्रकारांना पालकमंत्र्यांनी दिला. त्यामुळे पत्रकारांनी आपल्या अधिकारावर गदा येत असल्याची माहिती उपस्थित आमदारांना दिली. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीमध्ये पत्रकारांना निमंत्रित करा, असे सुचवले. मात्र, याची दखल न घेता पत्रकारांना बैठकीनंतर माहिती दिली जाईल, अशी सुचना केल्याने पत्रकारांनी या बैठकीचे वृत्तांकन न करण्याचा पवित्रा घेत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.

Intro:सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शभुंराज देसाई यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समीतीची पहिलीच बैठक आयोजित केली होती. कॅबीनेट तसेच राज्यमंत्री पदी वर्णी लागलेल्या दोन्ही सातारा जिल्ह्यातील मंत्र्याच्या उपस्थितीत जिल्ह्याच्या नियोजनाची महत्वपुर्ण बैठक होत असताना. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकारांना या बैठकीस उपस्थित राहण्यास मज्जाव केल्याने सातारा शहरातील पत्रकार, छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधीनी जिल्हा नियोजन समीतीनंतर झालेल्या पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला.

Body:जिल्ह्यात नवनिर्वाचित झालेल्या दोन्ही मंत्र्याच्या उपस्थितीत जिल्ह्याला काही महत्वपूर्ण निर्णयानुसार माहिती घेण्या हेतूने दिनांक 21 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विविध दैनिकांचे प्रतिनिधी तसेच छायाचित्रकार माध्यमांचे प्रतिनिधी वार्ताकनाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गेले होते. आपण फोटो काढून जावा, थांबू नका, असा इशाराच पत्रकारांना पालकमंत्र्यांनी दिला. यामुळे पत्रकारानी आपल्या अधिकारावर गदा येत असल्याची माहिती उपस्थित आमदारांना दिली. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठकीमध्ये पत्रकारांना निमंत्रीत करा असे सुचविले. मात्र याची दखल न घेता पत्रकारांना बैठकीनंतर माहिती दिली जाईल अशी सुचना केल्याने छायाचित्रकार व इलेक्ट्रॉनिक मिडीया पदाधिकार्‍यांनी या बैठकीचे वृत्तांकन न करण्याचा पवित्रा घेत जिल्हा नियोजन समीतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.

Conclusion:सातारा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.