सातारा - साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये पारा कमालीचा घसरल्याने( Mercury fell in Mahabaleshwar ) दवबिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळत ( Cold surge in Mahabaleshwar ) आहे. वेण्णालेक परिसरात ५ अंश तर ( Temperature of Mahabaleshwar is 5 degrees ) संपूर्ण महाबळेश्वरात सरासरी तापमान ७ अंशांवर आले ( Average temperature in Mahabaleshwar is 7 degrees ) आहे. सातारा जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी ( Severe cold in Satara district ) जाणवत आहे. महाराष्ट्राचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये तर थंडीचा कहर ( Cold weather in Mahabaleshwar ) पाहायला मिळत आहे. वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातील तापमान ५ ते ६ अंशांपर्यंत खाली गेल्याने या भागात दवबिंदू गोठले आहेत.
![Cold surge in Mahabaleshwar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-itgotcolderinsatarainmahabaleshwarthedewpointfrozeasthemercurydroppedto5degrees-10054_11012023102847_1101f_1673413127_878.jpg)
महाबळेश्वरात हिमकणांचा सडा - वेण्णालेकच्या लोखंडी जेटी, वेण्णालेक ते लिंगमळा परिसरातील वाहनांच्या टपांवर, स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये फुलांवर, तसेच स्मृतिवन परिसरात पाहावे तिकडे हिमकणांचा सडा पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या थंडीने जिल्ह्याला हुडहुडी भरली असून, कडाक्याच्या थंडीपासून बचावासाठी लोक शेकोट्या पेटवून ऊब घेत आहेत.
![Mercury fell in Mahabaleshwar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-str-1-itgotcolderinsatarainmahabaleshwarthedewpointfrozeasthemercurydroppedto5degrees-10054_11012023102847_1101f_1673413127_361.jpg)
उबदार कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी - कडाक्याच्या थंडीने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. महाबळेश्वरसह वेण्णालेक परिसर, लिंगमळा परिसरातील पारा कमालीचा घसरल्याने ढाबे, रेस्टॉरंटच्या बाहेर शेकोट्या पेटविल्या जात आहेत. पर्यटक शाल, स्वेटर, कानटोपी परिधान करून फेरफटका मारताना पाहावयास मिळत आहेत. मुख्य बाजारपेठेत ऊबदार कपडे खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला- सातारा शहराचा पारा देखील घसरला असून, मंगळवारी साताऱ्यातील पारा १० अंशांवर आला होता. दोन वर्षातील हे निच्चांकी तापमान ठरले. थंडीची तीव्रता वाढल्याने जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. शहरांमधील बाजारपेठेवर थंडीचा मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. साडे आठलाच बाजारपेठा बंद होत आहेत.
![cold increased in Mahabaleshwar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17456531_696_17456531_1673431062782.png)
कडाक्याच्या थंडीने आजारांमध्ये वाढ - वाढलेल्या थंडीचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. नदी काठावरच्या गावांमध्ये थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून लोक ऊब घेत आहेत. पहाटेच्या सुमारास शेत शिवारे धुक्यात हरवून जात आहेत. जिल्ह्यात सध्या थंडीची लाट पाहायला मिळत आहे. ऊसतोड कामगार आणि सकाळी कामावर जाणाऱ्या कामगार वर्गाला थंडीचा सामना करावा लागत आहे.