ETV Bharat / state

मराठा आरक्षणप्रश्नी पुण्यातील बैठकीसाठी उदयनराजे, शिवेंद्रराजेंना विनायक मेटेंचे निमंत्रण - पुण्यातील बैठकीसाठी उदयनराजेंना निमंत्रण

मराठा आरक्षणप्रश्नी शिवसंग्राम पक्षातर्फे ३ ऑक्टोबरला विचारमंथन बैठक आयोजित करण्यात आली आहे. 3 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता पुण्यात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करावे. तसेच या समाजाला दिशा देणे कामी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आपण उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांना केली असून त्यांनी ती मान्य केल्याचे आमदार मेटे यांनी सांगितले.

सातारा
सातारा
author img

By

Published : Sep 26, 2020, 3:47 PM IST

Updated : Sep 26, 2020, 4:12 PM IST

सातारा - शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी आज छत्रपती घराण्याचे वंशज खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेऊन पुण्यात ३ ऑक्टोबरला होणाऱ्या मराठा समाज विचारमंथन बैठकीस मार्गदर्शन करण्याची विनंती केली. मेटे यांनी आज दोघांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

माहिती देताना आमदार विनायक मेटे

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर महाराष्ट्रामध्ये तीव्र प्रतिकिया वेगवेगळ्या संघटना, समन्वयक, मान्यवर व समाजाकडून येत आहेत. पुढे काय करायचे, आंदोलनाबाबत काय निर्णय असावा याबाबात समाजामध्ये एक वाक्यता नाही, एक मागणी नाही. शनिवार दिनांक 3 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजता पुण्यात होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहून मार्गदर्शन करावे. तसेच या समाजाला दिशा देणे कामी पुढाकार घ्यावा, अशी विनंती आपण उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांना केली. त्यांनी ती मान्य केल्याचे आमदार मेटे यांनी सांगितले.

हेही वाचा - मराठा आरक्षण: अजित पवारांच्या बारामतीतील निवासस्थानासमोर 'ढोल बजाओ' आंदोलन

समाजातील वेगवेगळ्या संघटना, क्रांती मोर्चा, समन्वयक, विधी तज्ञ, मान्यवर इत्यादींना राज्यभरातून एकत्र आणून एक दिशा, एक मागणी, एक विचार नक्की करून त्यापद्धतीने आपआपल्या संघटनेने काम करावे, यासाठी मराठा समाजाची विचारमंथन बैठक पुण्यात बोलावली असल्याचे श्री. मेटे म्हणाले. उदयनराजे म्हणाले, 'नेतृत्व कोण करतंय याला महत्व नाही. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे. या लढ्याची सरकारला दखल घ्यावी लागेल.'

'मराठा आरक्षणाच्या लढ्याला पुण्यातील बैठकीनंतर निर्णायक दिशा मिळेल,' असे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर, अनिल देसाई, सुनील काटकर, अमोल मोहिते, अविनाश कदम आदी उपस्थित होते.

हेही वाचा - मराठा आरक्षण प्रश्नी शिवसंग्राम पक्षातर्फे 3 ऑक्टोबरला विचारमंथन बैठक

Last Updated : Sep 26, 2020, 4:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.