सातारा - दिवस होता १९४४ सालातील १० सप्टेंबरचा. शिक्षा भोगत असलेल्या नागनाथ आण्णांनी 'भारत माता की जय' म्हणत सातारा जेलच्या भिंतीवरून उडी मारली जमिनीवर पडताच तळहाताला झालेल्या जखमेतून रक्त वाहू लागले आण्णांनी जमिनीवरची माती जखमेत भरली आणि पोलीस लाईनमार्गे ते सातारा शहरात घुसले मित्रांच्या मदतीने मजल-दरमजल करत डोंगरकपारीतून कोयना खोऱ्यात आणि तेथून थेट वाळव्यात पोहोचले नागनाथ आण्णांच्या ही जेल उडी ऐतिहासिक Nagnath Naikwadi jumping sarara jail ठरली
चोवीस तास होता हत्यारी पोलिसांचा पहारा नागनाथ नायकवडी यांना इस्लामपूर जेलमधून सातारा जेलमध्ये हलवले आण्णांना पकडून तुरुंगात डांबल्याचा तो ४० वा दिवस होता सातारचा तुरुंग उंच होता चारी बाजूंनी काळ्या दगडाच्या भिंती मोठे प्रवेशद्वार कैद्यांना ठेवण्यासाठी बंद बऱ्याका आणि हत्यारी पोलिसांचा चोवीस तास पहारा इंग्रजांनी मला पकडून माझा अपमान केलाय मला तुरुंगात राहायचे नाही काही झाले तरी मला येथून बाहेर पडायचे आहे मेलो तरी चालेल मी आनंदाने गोळी झेलीन पण तुरुंगात खितपत पडणार नाही असे नागनाथ आण्णा कामेरीच्या एस बी पाटलांना म्हणाले तू माझ्या बरोबर तुरुंग फोडणार का येणार का माझ्या बरोबर असे विचारल्यावर जीव गेला पोलिसांचा मार खावा लागला तरी बेहत्तर मी तुझ्याबरोबर येणार असे एस बी नी सांगितले आणि जेलमधून पलायनाचा बेत आखण्यात आला
जेल फोडून नागनाथ आण्णा घुसले साताऱ्यात सातारा तुरुंगाच्या भिंतीलगत दुसऱ्या भिंतीचे कंपाऊंड होते पश्चिमेच्या बाजूला भिंत थोडी पडलेली होती तेथे तारेचे कंपाऊंड घातले होते खेळण्यासाठी लहान मुलांनी कंपाऊंडची तार वाकवून वाट केलेली त्यातच भिंती लगतचा चारा खाण्यासाठी गावातील मोकाट जनावरेही येत होती त्या बाजूने जेलमधून बाहेर पडता येणार होते भिंतीवर फुटक्या काचा रोवलेल्या भिंतीचा तट उंच त्यामुळे भिंतीवर चढणे सोपे नव्हते एक पोलीस कुलपे काढायच्या नादात असताना एकजण धान्य कोठारात धान्य ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर हिरू नावाच्या कैद्याने एका पोलिसाला बोलत गुंतवून ठेवले बर्डे गुरुजी एस बी पाटील वशीचे गावचे साळी आणि शामू पाटील हे तुरूंगाच्या भिंतीकडे तोंड करून बसले सर्व जण एकमेकांच्या खांद्यावर बसले सुरवातीला तळाची जोडी उभी राहिली नंतर एस बी पाटील उभे राहिले शेवटी आण्णा उभे राहिले नागनाथ आण्णांनी भारत माता की जय म्हणून भिंतीवरून खाली उडी मारली दुसऱ्या भिंतीचे कंपाऊंड पडलेल्या जागी अगोदरच केलेल्या वाटेने अण्णा बाहेर पडले एक पोलीस हातात पिशवी घेऊन पोलीस चाळीत निघाला होता त्याला पाहून पवित्रा बदलत नागनाथ आण्णाही चाळीत घुसले एवढ्या सकाळी वर्दळ नसल्याने आण्णा लगेच सातारा शहरात घुसले
एसपीने बेळगावातून मागवली १ हजार पोलिसांची फौज नागनाथ आण्णा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घरात आले आण्णा तुम्ही मला ओळखत नाही पण मी तुम्हाला ओळखतो मी नागनाथ नायकवाडी मी जेल फोडून बाहेर आलोय तुम्ही गणी भाईना बोलवता का असे नागनाथ आण्णा म्हणाले तेथे असलेल्या सुखटणकरांनी गणीभाई आत्तारांना बोलवायला माणूस पाठवला तोवर सातारा जेलमध्ये हाहा:कार माजला जेल मधील सर्व पोलीस जमा झाले जेलचा कोपरा न् कोपरा शोधला नागनाथ आण्णा कुठे दिसेनात. शेवटी पोलिसांनी बिगुल वाजवला पोलिसांची धावपळ सुरू झाली जेलर लगेच हजर झाले सर्व पोलिसांना आण्णांच्या शोधासाठी साताऱ्यात पाठवले घोडेस्वार पोलीस सातारा शहरात फिरू लागले नागनाथ आण्णांच्या फोटोच्या कॉपी काढून पोलीस दिसेल त्याला विचारू लागले सातारा डीएसपीने बेळगावला कळवून १००० पोलिसांची फौज मागवून घेतली सातारा शहराला वेढा दिला सातारा रेल्वे स्टेशनवर पोलिसांची एक तुकडी पाठवली सातारा-कोल्हापूर रस्त्यावर पोलिसांची तुकडी पाठवली नागनाथ अण्णांचे गाव वाळवा असल्याने त्या रस्त्याने अण्णा जाणार म्हणून तो रस्ता पूर्ण पोलिसांनी अडवला सातारा जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांना तारेने नागनाथ अण्णांनी तुरुंगातून पलायन केल्याचे कळवून नाकाबंदी केली
नागनाथ आण्णा बनले व्हॉलंटरी शाळा तपासणी अधिकारी सुखटणकरांचा निरोप मिळताच गणी आत्तार कर्मवीरांच्या घरी आले नागनाथ आण्णांना घेऊन आपल्या घरी गेले बेळगावहून आलेल्या पोलिसांनी सर्व सातारा पिंजून काढायला सुरुवात केली होती गणीभाईनी साहेबराव संदे व महादेव पाटील यांना बोलावून घेतले सातारच्या सर्व बाजूने असलेला पोलिसांचा वेढा तोडून साताऱ्यातून बाहेर पडायचे होते शहरात शस्त्रधारी व निशस्त्रधारी पोलिसांची धावपळ सुरू होती गुप्त पोलीस साध्या वेशात फिरत होते सातारा हेडक्वॉर्टरचे सर्व पोलीस आसपासच्या गावी पाठविले जात होते प्रत्येक सीआयडी पोलिसाच्या हातात नागनाथाण्णांचा फोटो होता आण्णांनी गनिमी कावा अवलंबून सातारच्या पश्चिमेकडील सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यातून बाहेर पडायचे ठरवले आण्णांना रयत शिक्षण संस्थेचे व्हॉलंटरी शाळा तपासणी अधिकारी केले रात्री साडे अकरा पोलिसांना चकवा देत एक-एक करत टेकडीच्या पायथ्याला गेले पोलिसांच्या पहाऱ्यातून निसटले नदीत उड्या टाकून तिघेही दुसऱ्या तीराला पोहोचले पहाटे पाचच्या दरम्यान नागनाथ आण्णा महादेव पाटील साहेबराव संदे तिघेही एकीव गावात पोहोचले
शाळा तपासणीचा बहाणा करत नागनाथ आण्णा कासच्या डोंगरावरून पालीमार्गे इंदोलीचे क्रांतिकारक दिनकरराव निकम यांच्याकडे गेले रात्रभर चालून पाटण खोऱ्यात पोहोचले डोंगर ओलांडून ते कोयनेच्या खोऱ्यातील तांबवे गावी पोहचले स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी असलेल्या सुपने-तांबवे येथील भूमिगत कार्यकर्ते डी जी पाटलांच्या मळ्यात येऊन थांबले यशवंतराव चव्हाणांना नागनाथ आण्णांनी सातारचा जेल फोडल्याची बातमी कळली होतीच त्यामुळे यशवंतराव चव्हाण हे नागनाथ आण्णांना भेटायला डी जीं च्या मळ्यात आले तेथे अनेक भूमिगत कार्यकर्ते जमले होते सगळ्यांनी नागनाथ आण्णांचे अभिनंदन केले अशा प्रकारे सातारा जेल फोडून आण्णा दऱ्याखोऱ्यातून वाट तुडवत तीन खोरी पालथी घालत वाळव्यातल्या ऐतवड्यात पोहोचले
हेही वाचा Best Of Bharat भारतीय कलाकृतीत अतुलनीय योगदान देणारे 10 प्रसिध्द भारतीय कलाकार