सातारा- जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार 1 हजार 695 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले. तर कोरोनाने तब्बल 42 बाधितांचा बळी घेतला.
बाधितांचा दर 27.47 टक्के-
आजवरचा पॉझिटिव्हीटी दर 23.18 असला तरी सध्या तो 30 च्या जवळ म्हणजे 28 वर गेला आहे. सातारा जिल्ह्याचा आकडा 1,695 पर्यंत गेला असला तरी उद्याचा आकडा याहीपेक्षा वाढेल, असा अंदाज आहे. विविध चाचण्यांतून तब्बल 6 हजार 170 नमूने घेण्यात आले. सर्वात जास्त 3 हजार 979 रॅपिड अँटीजन टेस्ट केल्या असून त्यापैकी 1 हजार 111 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी सुमारे 13 हजार रुग्ण उपचार घेत आहेत.
तब्बल 42 बाधितांचा मृत्यू-जिल्ह्यात बाधितांचे आकडे वाढल्यानंतर मृत्यूही वाढत चालले आहेत. गेल्या चोवीस तासात 42 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडाही उच्चांकी आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यातील 1 हजार 200 पर्यंत बादफितांची संख्या पोहचली होती. गेल्या आठ दिवसात हा उच्चांकी आकडाही पार झाला. सध्याचे आकडे चिंता वाढवणारे आहेत.
तर गुंतागुंत टळेल - जिल्हाधिकारी-
वेळीच तपासणी आणि वेळीच उपचार केले तर गंतागुंत वाढणार नाही. व्याधिग्रस्तांना सुद्धा वेळीच तपासणी आणि उपचार मिळाले तर रुग्णालयात भरतीची गरज भासणार नाही. वेळीच उपचार न मिळाल्यास बेडसाठी धावपळ करावी लागते. कितीही बेड वाढवले तरी ते पुरणारे नाहीत. आज साथरोगाचा जिल्ह्याच्या सर्व भागात प्रसार आहे. त्यामुळे कोणताही रुग्ण आला तरी तो कोरोना संशयित होऊ शकतो, असं समजून उपचार सुरु करा. जनरल प्राॅक्टीशनरकडून वेळीच कोविड उपचार मिळाले तर रुग्ण गंभीर होण्याचे, रुग्णालयात भरती करण्याची शक्यता मोठ्याप्रमाणात घटू शकते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - नाशिकमधील डॉ. झाकीर हॉस्पिटलमध्ये २२ रुग्ण दगावले, ऑक्सिजनच्या टॅंकमधून झाली होती गळती