ETV Bharat / state

श्रेयवादाची लढाई; शरद पवारांच्या आधी भाजपाकडून तृतीयपंथीयाच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन

सातारा येथे शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी होणारे दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन भाजपने तृतीयपंथीयाच्या हस्ते गुरूवारीच केले. यामुळे माण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप-राष्ट्रवादीतील श्रेयवाद उफाळून आला आहे.

Dahiwadi Nagar Panchayat Office
नगरपंचायत कार्यालयाचे उद्घाटन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 10:14 PM IST

दहिवडीच्या नगर पंचायत इमारतीच्या बांधकामाविषयी माहिती देताना भाजप पदाधिकारी

सातारा: खासदार शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी होणारे दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन भाजपने गुरूवारीच तृतीयपंथीयाच्या हस्ते केले. माण तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवादाचे शीतयुद्ध भडकले आहे.

शरद पवारांच्या दौऱ्याआधीच उद्घाटन: खासदार शरद पवार शुक्रवारी (दि. २५) सातारा दौऱ्यावर आहेत. सायंकाळी दहिवडीत त्यांची जाहीर सभा तसेच दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. असे असताना भाजपने आदल्या दिवशीच तृतीयपंथीय असते कार्यालयाचे उद्घाटन करून राष्ट्रवादीवर कुरघोडी केली आहे.

आ. गोरेंच्या प्रयत्नाने निधी आल्याचा दावा: दहिवडी नगरपंचायतीच्या इमारतीसाठी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने निधी आला आणला गेला होता. भाजपच्या साधना गुंडगे या नगराध्यक्ष असताना दहिवडी नगरपंचायतीची नूतन इमारत बांधण्याचा ठराव फेब्रुवारी 2017 मध्ये झाला होता, असे भाजपच्या माजी नगराध्यक्ष आणि तत्कालीन नगरसेवकांचे म्हणणे आहे.

इमारतीच्या कामाचा ठराव आमचाच: नगरपंचायतीच्या नूतनीमारतीसाठी तरतूद करून एक कोटीहून अधिक निधीला सभेत मंजुरी देण्यात आली होती. यासंदर्भातील ठरावाला वैशाली कदम सूचक आणि नलिनी काशीद अनुमोदक होत्या. इमारतीचे बांधकाम कसे करावे, याबाबत एप्रिल 2018 मध्ये झालेल्या सभेत आम्ही आढावा घेतला होता. 7 जून 2019 रोजी आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते नगरपंचायत इमारतीच्या बांधकामाला शुभारंभ करण्यात आला होता, असा दावाही नगरपंचायतीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

राष्ट्रवादीकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न: या इमारतीसाठी काडीमात्र योगदान नसणारे प्रभाकर देशमुख हे आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते इमारतीच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे. म्हणून आम्ही तृतीयपंथीयाच्या हस्ते नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केल्याचे दहिवडीच्या माजी नगराध्यक्षा साधना गुंडगे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा:

  1. कांद्याच्या निर्यात शुल्कात बदल करण्यासाठी केंद्राला शिफारस करणार - मंत्री अब्दुल सत्तार
  2. गोविंदांसाठी आनंदाची बातमी; मंत्री संजय बनसोडेंची मोठी घोषणा
  3. 'इंडिया' लोगोत देशाच्या स्वातंत्र्याचा, एकतेसह स्वाभिमानाचा रंग असणार - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.