ETV Bharat / state

Gram Panchayats Result: सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी अन् शिंदे गटाचा विजय; कॉंग्रेस, शिवसेनेची पाटी कोरी - सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा निकाल

जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. त्यामध्ये सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने तर पाटण विधानसभा मतदार संघातील उत्तर तांबवे ग्रामपंचायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेली. ( Gram Panchayats Result Satara District ) कराड दक्षिणमधील कोयना वसाहत ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व कायम राखले असून कराड उत्तरमधील सातपैकी सहा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता राहिली, तर कॉंग्रेस आणि शिवसेनेची पाटी कोरीच राहिली.

साताऱ्यात सात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय

author img

By

Published : Aug 5, 2022, 10:58 PM IST

सातारा - जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज शुक्रवार (दि. 5 ऑगस्ट)रोजी जाहीर झाला. त्यामध्ये सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने तर पाटण विधानसभा मतदार संघातील उत्तर तांबवे ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने विजयाचा झेंडा फडकवला. ( Gram Panchayats Result ) तर, कराड दक्षिणमधील कोयना वसाहत ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व कायम राखले आहे. कराड उत्तरमधील सातपैकी सहा ग्रामपंचायतीवर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी वर्चस्व मिळवले आहे.

पाटणमध्ये राष्ट्रवादीला शिंदे गटाचा धक्का - मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदार संघातील उत्तर तांबवे या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती. त्यामध्ये शिंदे-देसाई समर्थक पॅनेलने ४/३ असे सत्तांतर घडवून राष्ट्रवादीच्या पॅनेलचा निसटता पराभव केला आहे. राष्ट्रवादी समर्थक सत्ताधारी भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल विरूद्ध शिंदे-देसाई समर्थकांच्या जय हनुमान ग्रामविकास पॅनेलमध्ये चुरशीने निवडणूक झाली होती.

कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम - राष्ट्रवादीचे आमदार तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी कराड उत्तरमधील सातपैकी सहा ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे. नाणेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीची सत्ता स्थानिक आघाडीकडे गेली आहे. सातपैकी मांगवाडी आणि आदर्श नगर या ग्रामपंचायती राष्ट्रवादी गटाच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाल्या होत्या. निवडणूक झालेल्या बेलवडे हवेली, उत्तर कोपर्डे, पश्चिम उंब्रज, शितळवाडी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने सत्ता कायम राखली.

कोयना वसाहतीची सत्ता भाजपकडेच - कराड दक्षिणमधील कोयना वसाहत या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. या ग्रामपंचायतीवर भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या गटाची सत्ता होती. या निवडणुकीत १०/१ अशा फरकाने त्यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे.

परहर बुद्रुक ग्रामपंचायत रामराजे गटाकडे - फलटण तालुक्यातील परहर बुद्रुक या मुदत संपलेल्या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या गटाने ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली. जिल्ह्यातील एकूण दहापैकी आठ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने वरचष्मा राखला. शिंदे गट आणि भाजपने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. एक ग्रामपंचायत स्थानिक गटाकडे राहिली. तर, कॉंग्रेस आणि शिवसेनेची पाटी कोरीच राहिली.

हेही वाचा - बलात्कार पीडित मुलीला 35 आठवड्याचा गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.