सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ ( Covid Patients Increased In Satara ) दिसत असून, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ७३४ संशयित बाधित निष्पन्न ( Covid Spread In Satara ) झाले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १६.१० पर्यंत वाढला ( Satara Covid Positivity Rate ) आहे.
१ हजार ८१० रुग्णांवर उपचार सुरु
जिल्हा आरोग्य यंत्रणेने याबाबतची आकडेवारी प्रसिद्धीस दिली आहे. या आकडेवारीनुसार जिल्ल्ह्यात बाधितांचा वाढता दर लक्षात घेऊन चाचण्या वाढवल्या आहेत. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ४ हजार ५५९ नमूने घेण्यात आले. १५० रुग्णांना उपचार पूर्ण झाल्याने घरी सोडण्यात आले. तर १ हजार ८१० रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.
आठ दिवसांत लक्षणीय वाढ
जिल्ह्यात तिसरी लाट आल्याच्या चर्चा सुरू असतानाच आज आलेल्या सविस्तर अहवालात ७३४ रूग्ण बाधित आढळले आहेत. पॉझिटिव्हीटी रेटही गेल्या आठ दिवसांत दुप्पट वाढला आहे. तिन आठवड्यांपुर्वी म्हणजे २० डिसेंबर रोजीच्या अहवालात १२ लोक बाधित आढळले होते. बाधितांचा दर ०.६० इतका कमी होता. त्यानंतरचा आठवडाभर १५ ते २० दरम्यान रोज बाधित निष्पन्न होत होते. तथापि गेल्या आठ दिवसांत बाधितांनी ७०० चा आकडा ओलांडला आहे.
जिल्ह्यात आजअखेर
नमुने -२४,१३,०४०
बाधित -२,५५,३९६
मृत्यू - ६,५०४
मुक्त -२,४५,५९१