सातारा - सातारा जिल्ह्यात 172 गावे पूर प्रवण आहेत. या गावांमध्ये भविष्यात पूर परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी दिर्घकालीन उपाययोजना ( Rainfall Management In Satara ) कराव्यात. रस्त्यावर दरड कोसळल्यास स्थानिक नागरिकांच्या सहभागाने दरड तात्काळ हटवावी, असे निर्देश पालक सचिव ओ. पी. गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. त्याशिवाय, जिल्ह्यात कुठेही अतिवृष्टीमुळे आपत्ती निर्माण झाल्यास प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने तात्काळ मदतकार्य सुरु करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव ओ. पी. गुप्ता ( Guardian Secretary O. P. Gupta ) यांनी मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत ( Monsoon preparation Meeting ) सातारा जिल्हा प्रशासनाला दिले.
सातारा जिल्ह्यात 172 गावे पूर प्रवण - एकट्या सातारा जिल्ह्यात 172 गावे पूर प्रवण आहेत असे आढावा बैठकीत सांगण्यात आले. पावसाचा जोर वाढल्यास या गांवामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या टाळण्यासाठी काही दिर्घकालीन उपाययोजना कराव्यात ज्याने पूर येणार नाही. रस्त्यांवर दरड कोसळल्यास स्थानिक नागरिकांच्या सहभागाने दरड तात्काळ हटवावी. ज्या गावांचे कायमचे पुनर्वसन करावयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे ग्वाही ओ. पी. गुप्ता यांनी सांगितले.
पूर आल्यास पुलांवरील वाहतूक थांबवा - पूर आल्यानंतर नदी व ओढ्यांच्या पुलावरुन पाहणी वाहत असेल तर वाहतूक थांबवावी. ज्याने पूलांवरून वाहने नागरिक वाहून जाण्याचा धोका टळेल. त्याशिवाय पूल खटल्यास नागरिक त्यावरून हलगर्दी पणाने जाण्याचा प्रयत्न करणार नाहीत असेही निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव ओ. पी. गुप्ता यांनी मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत सातारा जिल्हा प्रशासनाला दिले.
साथ रोग पसरु नयेत - पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी साचल्याने रोगराई पसरी शकते. त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढते. त्याचा परिणाम नागरिकांवर होतो. साथ रोग पसरु नयेत, याची आरोग्य विभागाने दक्षता घेण्याबरोबरच ग्रामपंचायती, शाळा, महाविद्यालयांना पाणी पुरवठा होणाऱ्या स्त्रोतांची तपासणी करावी. असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव ओ. पी. गुप्ता यांनी मान्सून पूर्वतयारी आढावा बैठकीत सातारा जिल्हा प्रशासनाला दिले..
वीज पुरवठा खंडीत होणार नाही- वीज पुरवठा खंडीत होणार नाही, याची महावितरणने खबरदारी घेऊन नागरीकांच्या मदतीसाठी 24 तास सेवा सुरू ठेवावी. खंबाटकी घाटातील वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी चालकांना पावसातही रस्ता दिसण्यासाठी ठळक पद्धतीने दिशादर्शक लावण्याचे निर्देश ओ. पी. गुप्ता यांनी दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली उपाययोजनांची माहिती - जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संभाव्य आपत्ती संदर्भातील उपाययोजनांची सादरीकरणाद्वारे माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत, महावितरणचे गौतम गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अर्चना वाघमळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात 19.8 मिलीमीटर पाऊसाची नोंद - जिल्ह्यात बुधवारपर्यंत एकूण सरासरी 19.8 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर आतापर्यंत सरासरी 119.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत (24 तासात) झालेल्या चोविस तासात सातारा - 23.3 (91.7), जावळी - 47 (154.8), पाटण - 35 (157.5), कराड -14 (75.0), कोरेगाव - 9.7 (84.7), खटाव - 7.8 (46), माण - 3.6 (118.3), फलटण - 0.7 (65.4), खंडाळा - 2.7 (45), वाई - 18.3 (120.4), महाबळेश्वर - 85.6 (636.3) पावसाची नोंद झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा - कोल्हापूर जिल्ह्याला 21 ते 24 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 70 ते 120 मिमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस वाढल्याने नद्यांची पातळीही वाढणार असल्याचही सांगण्यात आले आहे. त्यामुळे डोंगराळ भागात भू:स्खलन होण्याची भिती वाढली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार- रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर समुद्र देखील खवळला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण ८०८.५०, तर सरासरी ८९.८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २३ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.