ETV Bharat / state

Satara Rain : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार, कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात पावणे दोन टीएमसीने वाढ - कोयना धरण पाणीसाठा

मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रति सेकंद 21 हजार 232 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे गेल्या चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल पावणे दोन टीएमसीने वाढ झाली आहे. नवजा येथे सर्वाधिक 244 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात सध्या 17 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून पायथा वीजगृहातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.

satara rain
सातारा पाऊस
author img

By

Published : Jul 6, 2022, 8:31 PM IST

सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात प्रति सेकंद 21 हजार 232 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे. यामुळे गेल्या चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल पावणे दोन टीएमसीने वाढ झाली आहे. नवजा येथे सर्वाधिक 244 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात सध्या 17 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून पायथा वीजगृहातील विसर्ग बंद करण्यात आला आहे.

नवजा येथे 244 मिलीमीटर पावसाची नोंद - कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे गेल्या चोवीस तासात तब्बल 244 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथे 197 तर कोयनानगर येथे 156 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरण परिसरात पावसाची संततधार आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणातील पाण्याची पातळी 2050 फूट झाली आहे. पुर्वेकडील सिंचनासाठी पायथा वीजगृहात सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

पावसाचा जोर आणि पाण्याची आवक वाढली - सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. संततधार पावसामुळे गेल्या तीन दिवसांपासून कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. गेल्या चोवीस तासात धरणात प्रतिसेकंद 21 हजार 232 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरणाच्या कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस पडत असल्याने कोयनेच्या जलाशयात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे.

चोवीस तासात पावणे दोन टीएमसी पाण्याची आवक - गेल्या चोवीस तासात धरणात 1.83 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा 17.83 टीएमसीवर पोहोचला आहे. खपाटीला गेलेला पाणीसाठा दमदार पावसामुळे आता झपाट्याने वाढू लागला आहे. मागील तीन दिवसात कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात पावणे चार टीएमसीने वाढ झाली आहे. त्यामुळे 13 टीएमसीपर्यंत घटलेला पाणीसाठा आता 18 टीएमसीच्या जवळपास पोहोचला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.