ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यायचे मी बघतो, ४८ तासात चारा छावण्या सुरू करा - विजय शिवतारे

चारा छावणीचालक ४ दिवसात ४ छावण्या सुरू करू शकत नसेल तर त्याची परवानगी काढली जाईल. त्यांच्या जागी दुसऱ्या छावण्यांना परवानगी दिली जाईल. छावणी सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून अनुदान देण्यात येईल, असे शिवतारे म्हणाले.

शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना पालकमंत्री विजय शिवतारे
author img

By

Published : May 18, 2019, 11:49 AM IST

Updated : May 18, 2019, 12:21 PM IST

सातारा - 'दुष्काळग्रस्त माणमध्ये ५१ पैकी २१ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित २० छावण्या ४८ तासात सुरू केल्या जातील. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरू करा. मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यायच मी बघतो. नवीन दहा गावांसाठी सक्षम संस्थांना बोलवून चारा छावण्या सुरू करण्यास सांगितले जाईल', असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. माण तालुक्याच्या दौऱ्यावर असताना प्रशासकीय अधिकारी, चारा छावणी चालक, शेतकरी यांच्याशी शिवतारे यांनी संवाद साधला.

शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना पालकमंत्री विजय शिवतारे

जनावरांना प्रथम प्राधान्य द्या. इतर गोष्टी दुय्यम आहेत. छावण्या सुरू होणे ही शासनाची जबाबदारी आहे. जाचक अटी न ठेवता लवकर छावण्या कशा सुरू करता येतील ते पाहा. चारा छावणीचालक ४ दिवसात ४ छावण्या सुरू करू शकत नसेल तर त्याची परवानगी काढली जाईल. त्यांच्या जागी दुसऱ्या छावण्यांना परवानगी दिली जाईल. छावणी सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून अनुदान देण्यात येईल, असे शिवतारे म्हणाले.

जनावरांचा खर्च छावणी चालकांना येणार नाही याची काळजी घेण्यात येईल. पाणी भरणा केंद्रावरून छावणीतील जनावरांसाठी लागणारे पाणी देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर छावण्या सुरू करण्यासाठी प्रांताधिकार्‍यांनी उशीर केल्यास नोटीस काढण्यात येईल, असेही ते म्हणाले.

चारा छावणीची पाहणी करताना पालकमंत्र्यांनी पशुपालकांशी संवाद साधला. चारा किती मिळतो? पाणी मिळते का? याची माहिती त्यांनी घेतली.

Intro:सातारा दुष्काळी माण मध्ये 51 पैकी 21 चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. उर्वरित वीस छावण्या 48 तासात सुरू केल्या जातील. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरु करा. "मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यायच मी बघतो.." नवीन दहा गावांसाठी सक्षम संस्थांना बोलवून चारा छावण्या सुरु करण्यास सांगितले जाईल. असे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी माण तालुक्याच्या दौऱ्यावर ती असताना सांगितले.

Body:जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे दुष्काळी दौऱ्यावर आल्यावरती प्रशासकीय अधिकारी, चारा छावणी चालक, शेतकरी यांच्याशी संवाद साधला. यावेळी आमदार जयकुमार गोरे हरणाई सूतगिरणी व ग्रीड शुगर साखर कारखान्याचे संस्थापक रणजित देशमुख, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ विरकर, अनिल सुभेदार, पृथ्वीराज गोडसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद पवार उपस्थित होते.

मंत्री शिवतारे म्हणाले जनावरांना प्रथम प्राधान्य द्या. इतर गोष्टी दुय्यम आहेत. छावण्या सुरू होणे ही शासनाची जबाबदारी आहे.
जाचक आठी न ठेवता लवकर छावण्या कशा सुरू करता येतील ते पहा. जे चारा छावणी चालक चार दिवसात चार छावणी सुरु करणार नाहीत. त्यांची परवानगी काढून घेऊन जे सध्या चारा छावणी चालवत आहेत त्यांना ती चालवण्यास परवानगी द्या. छावणी सुरू केल्याच्या पहिल्या दिवसापासून अनुदान देण्यात येईल, जनावरांचा खर्च छावणी चालकांना येणार नाही. याची काळजी घेऊ, पाणी भरणा केंद्र वरून छावणीतील जनावरांसाठी लागणारे पाणी देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्यानंतर छावण्या सुरु करण्यासाठी प्रांतआधिकार्‍यांनी उशीर केल्यास नोटीस काढण्यात येईल, जिल्हा बँक, पतसंस्था, साखर कारखान्यांना चालवण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्यात येतील. चारा छावणीची पाहणी करताना पालकमंत्र्यांनी पशुपालकांशी संवाद साधला चारा किती मिळतो..? पाणी मिळते का..? का याची माहिती त्यांनी घेतली.

व्हिडिओ सेंड whatsapp

Conclusion:
Last Updated : May 18, 2019, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.