ETV Bharat / entertainment

'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये नयनतारानं केले 'हे' 5 मोठे खुलासे, वाचा सविस्तर... - SOUTH ACTRESS NAYANTHARA

नयनताराच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' माहितीपटातून पाच मोठे खुलासे समोर आले आहेत.

Nayanthara
नयनतारा (नयनताराची डॉक्यूमेंट्री (Series Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 19, 2024, 1:18 PM IST

मुंबई : साउथ सिनेसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा सध्या चर्तेत आहे. अलीकडेच, 'नयनतारानं साऊथ अभिनेता धनुषच्या कॉपीराइटच्या 10 कोटी रुपयांच्या कायदेशीर नोटीसला सडेतोड उत्तर दिलंय. नयनताराला ही कायदेशीर नोटीस तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' या माहितीपटासाठी मिळाली होती. तिचा हा माहितीपट 18 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रसारित झाला. 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'ची कहाणी नयनताराच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर आधारित आहे. 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये नयनताराच्या आयुष्याशी संबंधित 5 मोठे खुलासे झाले आहोत.

'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये झाला मोठा खुलासा : 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये नयनतारानं तिच्या भूतकाळातील नात्याबद्दल चर्चा केली आहे. तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं तिला अभिनय सोडण्यास सांगितले होते, असं तिनं खुद्द या माहितीपटात सांगितलं. या डॉक्युमेंटरीमध्ये साऊथ सुपरस्टार नागार्जुन देखील आहे, ज्यानं अनेकदा नयनताराची कठीण काळात मदत केली. या डॉक्युमेंटरीमध्ये नयनतारानं तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव जाहीर केले नाही. मात्र ती लोकांवर लवकर विश्वास ठेवते, याबद्दल तिनं सांगितलं. दरम्यान नयनतारा अभिनेता सिलंबरासन टीआरमुळे चर्चेत होती, तिचे काही खाजगी फोटो लीक झाल्यानंतर तिच्या नात्याबद्दल पुष्टी झाली होती. त्यानंतर नयनताराचे नाव विवाहित प्रभुदेवाशीही जोडले गेले.

नयनताराचं आयुष्य वादात : 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये नयनताराबद्दल वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या काही वादग्रस्त माहितीबद्दलही सांगितलं गेलं आहे. या गोष्टींचा तिच्या आईवर वाईट परिणाम झाल्याचं नयनतारानं यात उघड केलं. या डॉक्युमेंटरीमध्ये वर्तमानपत्रातील अशा आर्टिकलबद्दल उल्लेख केला गेला आहे, ज्यात बॉडी शेम आणि करियर समाप्त याबद्दल लिहिले गेले आहे. तसेच नयनताराला हेल्थ इश्यू आणि खूप वाईट दिवसांमधून जावं लागलं होतं. तिच्या आयुष्यात खूप अप्स-डाउन आले. यानंतर तिला 'लेडी सुपरस्टार' हा टॅग मिळाला.

प्रेम, विश्वासघात आणि नंतर लग्न : 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये नयनतारानं तिच्या लग्नाचे सुंदर क्षणही टिपले आहेत. 9 जून 2022 रोजी तिनं चित्रपट दिग्दर्शक विघ्नेश शिवनशी लग्न केलं. 2015 मध्ये 'नानुम राउडी धान' या चित्रपटादरम्यान दोघेही एकत्र आले होते. नयनतारा आणि विघ्नेश यांनी चार चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. नयनतारा आणि विघ्नेशनं लग्नापर्यंत आपलं नातं लपवून ठेवलं होतं. या माहितीपटात या जोडप्याच्या लग्नाचे सुंदर क्षण दाखविण्यात आले आहे. आता या जोडप्याला जुळी मुले आहेत.

नयनताराचं करिअर : नयनतारा चित्रपटसृष्टीत दोन दशकांपासून काम करत आहे. या दोन दशकांमध्ये तिनं अनेक हिट चित्रपट दिले आहेत. 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मध्ये नयनतारानं हे स्टारडम कसे मिळवले याबद्दल देखील दाखविण्यात आलं आहे. नयनतारानं 2023 मध्ये तीन चित्रपटांमध्ये काम केलं. यात शाहरुख खानबरोबरचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान' देखील आहे. यामध्ये नयनताराचा अभिनय अनेकांना आवडला होता. आता नयनतारा 'टेस्ट', 'डियर स्टूडेंट्स', 'मननगट्टी सिंस 1960', 'रक्कई', 'थानी उरुवन 2', आणि 'मुकुटी अमन 2'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. नयनतारा स्टारर 'रक्कई'च्या पोस्टरसह टीझर आणि शीर्षक झालं प्रदर्शित
  2. धनुषनं नेटफ्लिक्सला 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल'मधील फुटेज हटवण्यासाठी दिला 24 तासांचा अल्टिमेटम
  3. सायमा 2024 पुरस्कार विजेत्यांची यादी, कोणी मारली बाजी जाणून घ्या... - SIIMA 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.