ETV Bharat / state

तरूणाकडून गावठी कट्टा, पिस्तूलसह दोन काडतुसे जप्त

author img

By

Published : Mar 17, 2021, 6:55 PM IST

रेल्वे फाटकाजवळ संशयास्पदरित्या फिरणार्‍या तरूणाकडून एक गावठी कट्टा, एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. अभिजीत लक्ष्मण मोरे (रा. तारगाव, ता. कोरेगाव), असे संशयीताचे नाव असून न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

Gawthi Katta and pistol seized from youth in Karad
तरूणाकडून गावठी कट्टा, पिस्तूलसह दोन काडतुसे जप्त

कराड (सातारा) - कराड ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील रेल्वे फाटकाजवळ संशयास्पदरित्या फिरणार्‍या तरूणाकडून एक गावठी कट्टा, एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. अभिजीत लक्ष्मण मोरे (रा. तारगाव, ता. कोरेगाव), असे संशयीताचे नाव असून न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

कराड-मसूर मार्गावरील कोपर्डे हवेली हद्दीत रेल्वे फाटकाजवळ एकजण गावठी कट्टा आणि पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना खबर्‍यामार्फत मिळाली होती. भरणे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक उदय दळवी, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, उत्तम कोळी, शशिकांत घाडगे, अमोल हसबे यांनी रेल्वे फाटक परिसरात सापळा रचला.

एक युवक रेल्वे फटकाजवळ संशयास्पदरित्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या डाव्या बाजूला खोवलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि उजव्या बाजुला देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि खिशात 2 जिवंत काडतुसे सापडली. कट्टा, पिस्तूल आणि काडतुसे मिळून 1 लाख 20 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून संशयीत अभिजीत मोरे याला अटक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.