ETV Bharat / state

कराडमध्ये 139 सार्वजनिक तर 9 हजार 560 घरगुती गणेशमूर्तींचे प्रीतिसंगमावर विसर्जन

कराडकरांनी अनंत चर्तुर्थदशीदिनी बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विसर्जनाची नियमावली तयार केली होती. त्यानुसार घरगुती गणेशमूर्तींचे जलकुंडात तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे प्रीतिसंगमावर विसर्जन करण्यात आले. प्रीतिसंगमावर नगरपालिका प्रशासनाने बोटीची व्यवस्था केली होती. संकलित करण्यात आलेल्या मूर्ती बोटीतून नदीपात्राच्या मध्यभागी खोल पाण्यात विसर्जित करण्यात आल्या.

karad
karad
author img

By

Published : Sep 20, 2021, 8:41 AM IST

कराड (सातारा) : कराडकरांनी अनंत चर्तुर्थदशीदिनी बाप्पाला साश्रूनयनांनी निरोप दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विसर्जनाची नियमावली तयार केली होती. त्यानुसार घरगुती गणेशमूर्तींचे जलकुंडात तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचे प्रीतिसंगमावर विसर्जन करण्यात आले. प्रीतिसंगमावर नगरपालिका प्रशासनाने बोटीची व्यवस्था केली होती. संकलित करण्यात आलेल्या मूर्ती बोटीतून नदीपात्राच्या मध्यभागी खोल पाण्यात विसर्जित करण्यात आल्या.

कराडमध्ये 139 सार्वजनिक तर 9 हजार 560 सार्वजनिक गणेशमुर्तींचे प्रीतिसंगमावर विसर्जन

139 सार्वजनिक तर 9 हजार 560 घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन

अनंत चतुर्दशीला कराड शहरातील 139 सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींचे नगरपालिकेच्या वाहनांमध्ये संकलन करून प्रीतिसंगमावर बोटींच्या साह्याने विसर्जन करण्यात आले. संकलनासाठी तयार करण्यात आलेली वाहने प्रत्येक मंडळाकडे जावून गणेशमूर्ती संकलित करत होती. तसेच महत्वाचे चौक आणि पेठनिहाय व्यवस्था करण्यात आलेल्या जलकुंडात घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर त्या मूर्ती वाहनांमधून कृष्णा घाटावर आणण्यात आल्या. त्याठिकाणी प्रशासनाच्यावतीने विधिवत पूजन करून त्यांचे खोल पाण्यात विसर्जन करण्यात आले. या पध्दतीने शहरातील 9 हजार 560 गणेशमूर्तींचे अनंत चतुर्दशीला विसर्जन झाले. या दरम्यान कराड शहरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच प्रीतिसंगमाकडे जाणारे मार्ग बॅरिकेटस् लावून बंद करण्यात आले होते.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडच्या प्रीतिसंगमावर येऊन बंदोबस्त आणि विसर्जनासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची पाहणी केली. विसर्जनासंदर्भात सरकारने तयार केलेल्या नियमावलीची अंमलबजावणी करून राज्यभरात गणेशमूर्तींचे विसर्जन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

कराडमध्ये 16 जलकुंड

कराड शहरात नगरपालिका प्रशासनाने 16 ठिकाणी जलकुंड (कृत्रिम तलाव) तयार केले होते. त्याठिकाणी विसर्जन केलेल्या मूर्ती वाहनातून आणून पुन्हा विधिवत नदीपात्रात विसर्जित केल्या. प्रीतिसंगमावर अजिबात गर्दी नव्हती. घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी एकही माणूस नदीवर आलेला दिसला नाही. ही शिस्त कराडमध्ये पहायला मिळाली. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने चांगले नियोजन केल्याने कोरोना नियमांचे पालन करून विसर्जन शांततेत पार पाडण्याचा प्रयत्न केला. दहा दिवसांच्या मुक्कामानंतर गणरायाला आपण साश्रूनयनांनी निरोप दिला आहे.

"पुढच्या वर्षी कोविडचे संकट नष्ट करून या"

'पुढच्या वर्षी येताना कोविडचे संकट मुळासकट नष्ट करून गणरायाने यावे आणि दहा दिवस गणरायाचे स्वागत, आदरातिथ्य आणि धार्मिक सोपस्कार करण्याची संधी महाराष्ट्रातील जनतेला द्यावी', अशी प्रार्थना गृहराज्यमंत्र्यांनी गणरायाच्या चरणी केली.

मागील वर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे तीव्र सावट होते. मात्र, यंदा कोरोना नियमांमध्ये थोडी शिथिलता आली. त्यामुळे सर्व ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. गणेशोत्सव साजरा करत असताना प्रशासनाच्या सूचना, नियमांचे सर्वांनी पालन केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात सर्व ठिकाणी शांततेणे गणेश विसर्जन झाले असल्याचे सहकार मंत्री तथा सातार्‍याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतींनी विसर्जनासाठी व्यवस्था केली. कराडला प्रीतिसंगमावर नगरपालिकेने चांगल्या सुविधा निर्माण केल्या. 18 ट्रॅक्टरच्या माध्यमातून गणेशमूर्तींचे संकलन करून प्रीतिसंगमावर विधीवत पूजन करून बोटींद्वारे खोल पाण्यात मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोरोनाचे संकट अद्याप पूर्णपणे टळलेले नाही. ही बाब लक्षात घेऊन कराडकरांनी प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे गणेशाचे आगमन आणि विसर्जन शांततेत पार पडल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा - वर्सोव्यात गणेश विसर्जनादरम्यान 5 मुले समुद्रात बुडाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.